नाशिक : औरंगाबाद महामार्गावरील जनार्दन स्वामी मठाजवळील चौफुलीवर निफाडहून नाशिककडे येणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत क़ का़ वाघ महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थी व त्याची वर्गमैत्रिण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि़२) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली़ या दोघांनाही पंचवटीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर मुलीवर उपचार सुरू आहेत़मुंबई-आग्रा महामार्गावरील क़ का़ वाघ महाविद्यालयात अक्षय दिलीप अखेनिया (२०, सोनल पार्क, अमृतधाम) व ऐश्वर्या गणेश पिल्लई (२०, त्रिमूर्ती चौक, सिडको) हे दोघेही अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकत होते़ हे दोघेही सोमवारी (दि़२) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दुचाकीवरून (जीजे १५, एएल ५६४१) तपोवनाकडून औरंगाबाद महामार्गाकडे येत होते़ त्यावेळी निफाडकडून येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली़या धडकेत अक्षय अखेनिया दुचाकीवरून फेकला गेला, तर पाठीमागे बसलेली त्याची वर्गमैत्रिण ऐश्वर्या पिल्लई ही बाजूला फेकली गेल्याने गंभीर जखमी झाली़ अपघातानंतर चारचाकी वाहनाचे टायर फुटून ते दुभाजकाला जाऊन आदळले़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या या दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल केले असता अक्षयचा मृत्यू झाला, तर ऐश्वर्यावर उपचार सुरू आहेत़ या अपघातात ठार झालेल्या अक्षयचे आई-वडील दक्षिण आफ्रि केत राहत असून, शिक्षणासाठी तो नाशिकमधील वसतिगृहात राहत असल्याचे वृत्त आहे़ दरम्यान, या अपघाताची आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
वाहनाच्या धडकेने विद्यार्थी ठार; एक जखमी
By admin | Updated: March 3, 2015 00:35 IST