शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी चौघा मित्रांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:47 IST

आडगाव शिवारातील क़ का़ वाघ कृषी महाविद्यालयातील शुभम पाटील (२०, रा़ महाबळ रोड, पारिजात कॉलनी, जळगाव) या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या खोलीतील चार सहकारी मित्रांविरोधात आडगाव पोलिसांनी शुक्रवारी (दि़ २२) आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

नाशिक : आडगाव शिवारातील क़ का़ वाघ कृषी महाविद्यालयातील शुभम पाटील (२०, रा़ महाबळ रोड, पारिजात कॉलनी, जळगाव) या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या खोलीतील चार सहकारी मित्रांविरोधात आडगाव पोलिसांनी शुक्रवारी (दि़ २२) आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. शुभमने सोमवारी (दि़ १८) आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या  चिठ्ठीत रूममधील चौघा सहकारी मित्रांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़ मूळचा जळगावचा असलेला शुभम पाटील हा कक़ा़ वाघ कृषी महाविद्यालयात मायक्रो बायोलॉजीच्या तिसºया वर्षाचे शिक्षण घेत होता. आडगाव शिवारातील धात्रक फाटा परिसरातील बळीरामनगरच्या एका रो-हाउसमध्ये शुभम हा संशयित अक्षय तुकाराम आवारे, शीतल लक्ष्मण कलाल, नेताजी गोरखनाथ आरोटे व कल्पेश रामचंद्र चौधरी यांच्यासमवेत राहत होता़ या रूममधील पंख्याला गळफास घेऊन शुभमने आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले़ पोलिसांना शुभमचे मृतदेह हा दोन्ही हात पाठीमागे बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता़ त्यामुळे त्याची आत्महत्या की खून याबाबत पोलिसांना संशय होता़ त्यांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.  रविवारी (दि. १७) रात्रीच्या सुमारास सर्व विद्यार्थी वरच्या खोलीत झोपण्यासाठी गेले असता शुभम हा खालच्या खोलीत झोपला होता. सोमवारी सकाळी शुभमचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती़ पोलिसांना शुभमने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली होती. या चिठ्ठीत लिहिलेल्या मित्रांच्या नावानुसार पोलिसांचा तपास सुरू होता़ वडिलांची फिर्याद शुभम पाटील हा क़ का़ वाघ कृषी महाविद्यालयात मायक्रो बायोलॉजीच्या तिसºया वर्षाचे शिक्षण घेत होता. या प्रकरणी मयत शुभमचे वडील रामभाऊ पाटील यांच्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांनी त्याचे रूममधील सहकारी संशयित अक्षय आवारे, शीतल कलाल, नेताजी आरोटे व कल्पेश चौधरी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा