शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शहरात मान्सूनची जोरदार सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:10 IST

नाशिक : शहर व परिसरात शुक्रवारी (दि.१२) दुपारी मान्सून सरींनी जोरदार सलामी दिल्याने लॉकडाऊन व संचारबंदीतून बाहेर पडून सुरुळीत होऊ पाहणारे जनजीवन काहीकाळापुरते का होईना विस्कळीत झाले. हवामान खात्याकडून रविवारपासून जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज वर्तविला जात असताना तत्पूर्वीच दोन दिवस अगोदरच पावसाने शहरात हजेरी लावून झोडपून काढल्याने बळीराजासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

नाशिक : शहर व परिसरात शुक्रवारी (दि.१२) दुपारी मान्सून सरींनी जोरदार सलामी दिल्याने लॉकडाऊन व संचारबंदीतून बाहेर पडून सुरुळीत होऊ पाहणारे जनजीवन काहीकाळापुरते का होईना विस्कळीत झाले. हवामान खात्याकडून रविवारपासून जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज वर्तविला जात असताना तत्पूर्वीच दोन दिवस अगोदरच पावसाने शहरात हजेरी लावून झोडपून काढल्याने बळीराजासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अवघ्या दीड तासात शहरात ५०.८ मिलीमीटर इतका पाऊस पडल्याची नोंद पेठरोडवरील हवामान केंद्राने केली असून, या पावसामुळे महापालिकेने पावसाळापूर्व केलेल्या गटारी व नालेसफाईच्या कामांचे पितळ उघडे पडले आहे.नाशिक शहरासह जिल्ह्यात ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे यंदा मान्सून ७ जून ऐवजी १५ जूनला बरसणार असा कयास हवामान विभागाने लावला होता; मात्र केरळमधून पुढे महाराष्टÑाच्या दिशेने मान्सूनची वाटचाल वेगाने झाली. शुक्रवारी दुपारी ३ वाजेपासून पावसाच्या दमदार सरी शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये कोसळल्या. वाऱ्याचा वेग अत्यंत कमी राहिल्यामुळे टपोºया थेंबांसह जोरदार सरींचा वर्षाव शहरात सुमारे तासभर झाला. शहरात दुपारी २ वाजेपासून पावसाचे ढग दाटून आले आणि सूर्यप्रकाश पूर्णपणे नाहीसा झाला व अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. साधारणत: तासभर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर काहीसा वेग मंदावला असला तरी, यामुळे परिसरातील रस्ते जलमय झाले होते. अनलॉकमुळे व्यावसायिकांनी आपापली दुकाने सकाळपासूनच उघडली होती. अचानकपणे आलेल्या पावसामुळे काही प्रमाणात व्यावसायिकांसह रस्त्यांवरील लहान विके्रत्यांचीसुद्धा तारांबळ उडाली. पावसाने आपला माल भिजणार नाहीत, याची खबरदारी भद्रकाली, रविवार कारंजा, मेनरोड, शालिमार, पंचवटी, नाशिकरोड या भागातील विक्रेत्यांकडे पहावयास मिळाली. पहिल्याच पावसात महापालिकेच्या भुयारी गटार व पावसाळी गटारींची दैनावस्था झाली. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले, तर उपनगरांमध्येही घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वत:हूनच पाण्याला वाट करून दिली तर काही ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने नाले, गटारींचे झाकणे मोकळे करून द्यावे लागले.---------------------------मनपाच्या पावसाळापूर्व कामांचे पितळ उघडेमहापालिका प्रशासनाने पावसाळापूर्व केलेल्या कामांचे पितळ उघडे पडले. अक्षरश: गटारी रस्त्यांवरून ओसंडून वाहू लागल्याने राजेबहाद्दर लेन, सारस्वत नाला, दहीपूल, कानडे मारुती लेन, भद्रकाली, दूधबाजार या भागात गटारी रस्त्यांवर अवतरल्याचे चित्र पहावयास मिळाले. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. गटारींचे काळेकुट्ट सांडपाण्याचे पाट रस्त्यांवरून ओसंडून वाहत असल्याचे बघून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.--------------------गोदावरीचा जलस्तर वाढलामुसळधार पावसामुळे गोदावरी नदी पात्राच्या पाण्यात वाढ झाली शहरांमधील वाहून येणारे पाणी गोदावरीत मिसळले तसेच पावसाळी भुयारी गटारीदेखील गोदाकाठावर ओसंडून वाहत होत्या यामुळे गोदावरीत दुर्गंधीयुक्त सांडपाणीदेखील मिळाल्याचे गोदावरीप्रेमींनी सांगितले. तासभर शहरात पावसाचा जोर कायम राहिल्याने रामकुंडाजवळ असलेल्या गंगा गोदावरी मंदिर परिसराला पाण्याचा वेढा पडला होता.-----------------------नाशिकरोड परिसरात दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाचे आगमन झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे रस्त्यावरील विक्रेते, पादचारी, दुचाकीचालक यांची तारांबळ उडाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूने पावसाच्या पाण्याचे पाट वाहत होते. नाशिकरोड, जेलरोड, देवळालीगाव, उपनगर आजूबाजूच्या परिसरात शुक्रवारी दुपारी तासभर मुसळधार पावसाचे पाण्याचे तळे साचले होते.

टॅग्स :Nashikनाशिक