कोविड बाधितांकडून नियमांना हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 11:16 PM2020-10-03T23:16:52+5:302020-10-04T01:15:52+5:30

ओझर : कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या ओझरमध्ये काही कोरोनाबधितांकडूनच प्राथमिक नियमांना हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे.

Strike the rules from Kovid victims | कोविड बाधितांकडून नियमांना हरताळ

कोविड बाधितांकडून नियमांना हरताळ

Next
ठळक मुद्देआकडा ८०० पार : आरोग्य यंत्रणा हतबल

ओझर : कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या ओझरमध्ये काही कोरोनाबधितांकडूनच प्राथमिक नियमांना हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे.
आजमितीस ओझरमधील बाधितांचा आकडा ८२१ वर पोहोचला असून त्यात जवळपास चारशे रु ग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. जे रु ग्ण होम क्वारण्टाइन होत आहे त्यातील काहीजण सरकारने घालून दिलेल्या नियंमनाच केराची टोपली दाखवत असल्याने आरोग्य ,ग्रामपालिका, महसूल यंत्रणा हतबल झाली आहे. यंत्रणेला प्रत्येक ठिकाणी उपाययोजना करता करता नाकीनव आले आहे. रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात लोक मास्क न घालता सहजपणे वावरताना दिसून येत आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी ओझरला कधीही पथक भेट देऊन पाहणी करणार असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.
कोट....
राज्य शासन ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही संकल्पना राबवत आहे. सर्वच लोकांनी यात सहभागी होऊन काळजी घ्यायची आहे. बधितांची संख्या बघता कुणीही संपर्कात आलेल्या विषयी माहिती लपवू नये. खरी माहिती दिल्यास ती भविष्यात फायद्याचीच आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
- डॉ.अर्चना पठारे, प्रांताधिकारी, निफाड

 

Web Title: Strike the rules from Kovid victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.