वणी : दिंडोरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून कोविड सेंटर कमी पडत असल्याने ग्रामीण रुग्णालयात बाधितांना दाखल करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. वणी येथे बाधितांची संख्या पाहता प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. मार्गदर्शक नियम व सूचनांचा भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.अत्यावश्यक सेवा व अनुषंगिक व्यवसाय वगळता इतर व्यवसाय बंद ठेवण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. प्रांत अधिकारी संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत, वणी ग्रामपालिका, महसूल विभाग व पोलीस यंत्रणा सर्वार्थाने प्रयत्नशील भूमिकेत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग नागरिकांच्या आरोग्याची कसोटी पाहत आहे.मात्र अनेकांना याचे गांभीर्यच नाही. जमावबंदीचा आदेश असतानादेखील गटागटाने चौकाचौकात बसणारे, विनाकारण फेरफटका मारणारे, अशा लोकांमुळे कोरोनास पोषक वातावरण तयार होते तर, कोरोनाबाधितांच्या घरातील सदस्य खुलेआम बाहेर भटकंती करताना दिसून येत असल्याने नाईलाजाने प्रशासनाला कडक कारवाई करावी लागत आहे.कोविड नियम बासनात गुंडाळून ठेवायचे व दुसरीकडे प्रशासनाच्या नावाने बोटे मोडायची, असे चित्र नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचे आवाहन वारंवार प्रशासन करीत आहे. तर पालन योग्य होत नसल्याने हतबलतेची स्थिती प्रतिकूल परिणामास सामोरे जावे लागण्याची चिन्हे प्रशासनाची मनोबलाची कसोटी पाहणारी असल्याने नागरिकांनी कोरोना साखळी तोडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता कडक निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 18:39 IST
वणी : दिंडोरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून कोविड सेंटर कमी पडत असल्याने ग्रामीण रुग्णालयात बाधितांना दाखल करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. वणी येथे बाधितांची संख्या पाहता प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. मार्गदर्शक नियम व सूचनांचा भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता कडक निर्बंध
ठळक मुद्देनियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई