शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

रुग्ण आढळणाºया ठिकाणी आता कडक लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 19:39 IST

शहरात जास्तीत जास्त रुग्णसंख्या आढळून येत असल्याची वस्तुस्थिती लक्षात घेता यापुढे ज्या भागात अधिक रुग्ण आढळतील अशा ठिकाणी कठोर लॉकडाऊन करण्यात येणार आहे. शहरातील अनेक भागात एकाचवेळी मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कडक अंमलबजावणीचा पर्याय समोर आला आहे.

नाशिक : शहरात जास्तीत जास्त रुग्णसंख्या आढळून येत असल्याची वस्तुस्थिती लक्षात घेता यापुढे ज्या भागात अधिक रुग्ण आढळतील अशा ठिकाणी कठोर लॉकडाऊन करण्यात येणार आहे. शहरातील अनेक भागात एकाचवेळी मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कडक अंमलबजावणीचा पर्याय समोर आला आहे.पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्र वारी (दि.१०) जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोरोना नियंत्रणबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस जिल्हा प्रशासन आणि वैद्यकीय विभागातील अधिकारी उपस्थित होते.शहरात आढळणाऱ्या रुग्णसंख्येचा विचार करता यापुढे अधिकाधिक रुग्ण खाटांची आवश्यकता लागणार असल्याने त्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. चर्चेत मेडिकल कॉलेज ३५०, एसएमबीटी कॉलेज १५० बेड उपलब्ध होऊ शकतात. येणार सर्व खर्च शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आॅक्सिजन टँकची आवश्यकता असलेल्या ठिकाणी तशी व्यवस्था केली जाणार आहे. कोविड सेंटरमध्ये अधिकाधिक सक्षम सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, शासकीय आस्थापनांच्या रुग्णालयाच्या खाटांवरदेखील चर्चा झाल्याचे कळते.शासनाकडून कोरोनाची औषधे व इतर खर्चासाठी सहा कोटी रु पयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. शासनाकडून येणाºया नवीन औषधांचा वापर शासकीय रु ग्णालयात प्राधान्याने करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. जिल्हा रु ग्णालयात टेस्टिंग लॅब सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले असून, लवकरात लवकर शासनाची लॅब सुरू करण्यासाठीचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती बैठकीत पालकमंत्र्यांनी दिली. जास्तीत जास्त टेस्टिंग करून अधिकाधिक रु ग्णांचा शोध घेऊन उपचार करण्यात येत आहे.---इन्फो---मृत्युदारात नाशिक १२व्या क्र मांकावरशहरात आढळणाºया रुग्णांबरोबरच रुग्ण दगावण्याच्यादेखील घटना घडत आहेत. मृत्युदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्टÑाच्या तुलनेत नाशिकमधील मृत्युदर कमी असून, अन्य शहरांच्या तुलनेत आपला क्र मांक १२वा आहे, तर रिकव्हरी दर पाचव्या क्र मांकावर आहे. असे असले तरी मृत्युदर आणखी कमी होण्यासाठीचे यंत्रणा प्रयत्न करीत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलChagan Bhujbalछगन भुजबळ