शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'नाईट कर्फ्यू'मध्ये राहणार कडक नाकाबंदी; रात्री ११ वाजेपासून अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 21:55 IST

रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेदरम्यान अत्यावश्यक सेवा किंवा जीवनावश्यक वस्तु सेवा वगळता इतर नागरिकांना शहरात वावरण्यास पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

ठळक मुद्देपहाटे पाच वाजेपर्यंत चोख रात्र गस्तीचे आदेश

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला असून पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार रात्री ११वाजेपासून शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्वच पोलीस ठाण्यांमधील विविध 'अ' पॉइंटवर बॅरिकेडद्वारे कडक नाकाबंदी व पहाटेपर्यंत चोख पोलीस गस्त घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिले आहे.रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेदरम्यान अत्यावश्यक सेवा किंवा जीवनावश्यक वस्तु सेवा वगळता इतर नागरिकांना शहरात वावरण्यास पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कलम-१४४नुसार पाण्डेय यांनी अधिसूचना सोमवारी (दि.२२) जारी केली आहे. ही अधिसुचना सोमवारी रात्री ११ वाजेपासून लागू करण्यात आली आहे. संचारबंदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. रात्रीची गस्त सोमवारी वाढविण्यात आली होती. तसेच नाकाबंदीला सुरुवात करण्यात आली आहे. पाण्डेय यांच्या आदेशानुसार पोलीस ठाणेनिहाय महत्वाच्या पॉइंटवर बॅरिकेड लावून वाहनचालकांची विचारपुस व तपासणी केली जात होती. प्रत्येकाला मास्कचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन, गुटखा, तंबाखू सेवन करण्यास किंवा थुंकण्यास बंदी आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स, स्वच्छता आदी नियमांचे पालन करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प पाण्डेय यांनी स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य