शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कचरा डेपोतील कुबट धुराने ओझरकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 12:46 IST

ओझर : येथील कचरा डेपोतील ढीग रात्रीच्यावेळी जाळण्याच्या प्रयोगात हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. धुराचे लोळ सगळ्या गावात जात असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने अनेकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.त्यात सर्वच प्रकारचा कचरा येथे एकत्र केला जात असल्याने यो धूर अत्यंत विषारी ठरत आहे.

ओझर : येथील कचरा डेपोतील ढीग रात्रीच्यावेळी जाळण्याच्या प्रयोगात हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. धुराचे लोळ सगळ्या गावात जात असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने अनेकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.त्यात सर्वच प्रकारचा कचरा येथे एकत्र केला जात असल्याने यो धूर अत्यंत विषारी ठरत आहे. त्यामुळे अनेकांना गंभीर आजार जडण्याची भीती व्यक्त होत आहे.सध्या ओझर येथे सर्वाधिक चर्चेचा मुद्दा उपस्थित होतोय तो म्हणजे कचरा जाळण्यामुळे होणाऱ्या त्रासाचा. येथे जुन्या सायखेडा रोड जवळील अनुसया पार्कला लागून असलेल्या कचरा डेपोच्या दुर्गंधीने अनेक जण हैराण झाले आहे. त्यामुळे परिसरात आजारपण वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.ओझर येथे बाणगंगा नदी किनारी मारु ती वेस स्मशानभूमी मागे व जुन्या सायखेडा रोडला लागून कचरा डेपो असून गावातील तसेच उपनगरातील सर्व कचरा हा घंटागाडीने तेथे आणून टाकला जातो.परंतु गावचा वाढता विस्तार व दररोज हजारो किलो जमा होत असलेला ओला व सुका कचरा हा सदर ठिकाणी आणून टाकला जात असताना त्याची विल्हेवाट रात्री जाळून लावण्यात येत असल्याने तो नागरिकांच्या जीवावर उठत आहे. ओला सुका कचरा एक होत असल्याने जागेची प्रचंड कमतरता होत आहे. कचरा डेपोला लागूनच वसाहत आहे तर नदी पलीकडे शेती व शेलार,शिंदे,कदम वस्ती आहे. या आधीही जेसीबीच्या सहाय्याने डम्पिंग करत असताना त्याची दुर्गंधी नागरिकांना सहन करावी लागली होती. सध्या सायंकाळनंतर दररोज कचरा जाळण्याचे प्रमाण वाढल्याने पसरत असलेल्या धुराचे लोळ दुर्गंधी मुळे नागरिकांचे घराबाहेर पडणे मुश्किल झाल्याने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महत्वाची बाब म्हणजे सार्वजनिक शौचालाय सदर ठिकाणी असल्याने कुबट वासाचा सामना लहान मुलांपासून तर वयोवृद्ध लोकांना देखील करावा लागत आहे. सदर प्रकरण गंभीर असताना सुद्धा प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी का खेळत आहे असा सवाल सामान्य नागरिकांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक