शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

उपग्रहवेधी क्षेपणास्त्र क्षमता सिध्द झाल्याने देशाच्या संरक्षणाला बळ: अपुर्वा जाखडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 20:43 IST

भारताने मिसाईलच्या सहाय्याने अवकाशात असलेला कमी उंचीवर असलेला उपग्रह (लो आर्बिट) पाडल्याने असा उपग्रह क्षेपणास्त्राने पाठवण्याचे तंत्र आपण साध्य केले आहे. संरक्षणदृष्टया अशाप्रकारचे अनेक उपग्रह भारत सोडत असतोच आताही एक एप्रिल रोजी उपग्रह सोडले जाणार आहे.

ठळक मुद्देभारतीय शास्त्रज्ञांनी आज मैलाचा दगड ठरेल अशी कामगिरी केली

भारताने उपरोधक शस्त्र म्हणजेच ए सॅट लाईव्ह सॅटेलाईटचा वेध घेतल्याने भारताला अवकाश संशोधन संस्थेला मोठे ऐतिहासीक यश मिळाले आहे. आपण एअर स्ट्राईक करू शकतो हे जगाने बघितले आहे परंतु त्यापलिकडे जाऊन अवकाश क्षेत्रात देखील संरक्षणासाठी आपण सज्ज झालो आहेत. ही मोठी उपलब्धी भारताच्या दृष्टीने आहे. विशेषत: सद्य स्थितीत शेजारील राष्टÑांशी सध्या सुरू असलेल्या तणावपुर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर हे खूप सूचक आणि यश आहे. अमेरीका, रशिया आणि चीन नंतर भारतानेच ही क्षमता सिध्द केली आहे.

बदलत्या काळात युध्दाचे तंत्र बदलु लागले आहे. त्यासाठी वापरली जाणारी माध्यमे देखील बदलली जात आहे. अवकाशातील संरक्षण हे देखील आता काळाची गरज बनली आहे. इस्त्रो आणि डीआरडीओ या यंत्रणांनी या संदर्भातील मोठी कामगिरी केल्याने ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहे. भारताने मिसाईलच्या सहाय्याने अवकाशात असलेला कमी उंचीवर असलेला उपग्रह (लो आर्बिट) पाडल्याने असा उपग्रह क्षेपणास्त्राने पाठवण्याचे तंत्र आपण साध्य केले आहे. सध्या तणावाच्या स्थितीमुळे अनेकांना हा विषय समजल नाही. नक्की कोणाचा उपग्रह पाडला किंवा भारताला उपद्रव देणाऱ्या एका राष्टÑाशी संबंधीत हा विषय आहे काय अशी चर्चा यातून सुरू झाली. मुळात असा कोणताही प्रकार नाही. प्रात्यक्षिक करण्यासाठी भारतानेच एक उपग्रह अवकाशात सोडला होता आणि तोच पाडला आहे. त्यामुळे भारताचे फार मोठे नुकसान झाले असेही नाही. कारण तो अवकाशात कमी उंचीवर होता.देश हिताच्या दृष्टीकोनातून तसेच दळणवळणाच्या दृष्टीकोनातून अनेक प्रकारचे ुउपग्रह भारतासह अनेक देश अंतराळात सोडतात. भारताने उपग्रह सोडल्यानंतर त्याचा दळणवळण, हवामान, शेती, मासेमारी करणारे यांच्यासह अन्य मानवी जीवनाच्या उपयुक्ततेसाठी सोडत असतो. संरक्षणदृष्टया अशाप्रकारचे अनेक उपग्रह भारत सोडत असतोच आताही एक एप्रिल रोजी उपग्रह सोडले जाणार आहे.

भविष्यात अशाप्रकारचा एखादा उपग्रह भारतीय संरक्षणाला बाधक अशाप्रकारचे कृत्य करीत असेल हेरगिरी किंवा छायाचित्र घेण्याचे काम भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने घातक असल्यास भारत त्याला पाडू शकतो ही मारक क्षमता यातून जोखली गेली आहे. हे करताना भारताने युनोच्या स्पेस लॉचे तंतोतंत पालन करण्यात आले आहे. म्हणजेच अन्य देशांना नुकसान होईल किंवा त्यांच्या उपग्रहाची हानी होईल अशाप्रकारचे कृती भारताने केलेली नाही. मुळातच भारतात विक्रम साराभाई यांच्या सारख्या धुरीणींनी इस्त्रो स्थापन करतानाच अंतराळ कार्यक्रम हा विधायक कार्य म्हणजेच मानवी जीवनाच्या कल्याणासाठी असले अशीच भूमिका घेतली होती. युनोची देखील तीच भूमिका आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून झटणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांनी आज मैलाचा दगड ठरेल अशी कामगिरी केली असून त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.- अपुर्वा जाखडी, स्पेस एज्युकेटर, नाशिक

टॅग्स :Mission Shaktiमिशन शक्तीNashikनाशिकscienceविज्ञानisroइस्रोDRDOडीआरडीओ