शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रात उडी घेणाऱ्या तरूणीला ‘निर्भया’चे गोदाकाठावर बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 22:16 IST

....अखेर त्यांनी तिचा मोबाईल ताब्यात घेऊन त्याद्वारे तिच्या जवळच्या मैत्रिणींसोबत संपर्क साधला. साधारणत: तासाभरात तिच्या मैत्रिणी तेथे पोहचल्या.

ठळक मुद्देप्रेमवीराला ‘खाकी’ शैलीत समजनंदूरबार जिल्ह्यातून शहरात उच्चशिक्षण घेण्यासाठी

नाशिक : प्रेमभंग झाल्यामुळे नैराश्यात बुडालेल्या एका २२ वर्षीय तरूणीने थेट सोमेश्वर मंदिराच्या परिसरातील गोदाकाठ गाठून आत्महत्त्येची तयारी के ल्याचे लक्षात आल्यानंतर एका जागरूक रिक्षाचालकाने तत्काळ ‘निर्भया पथका’ला माहिती दिली. काही वेळेतच निर्भया पथक-२ तत्काळ सोमेश्वर परिसरात दाखल झाले आणि या पथकामधील साध्या वेशातील महिला पोलिसांनी त्या युवतीला ताब्यात घेऊन समुपदेशन करत तिच्या मैत्रिणींना बोलावून सुखरूप त्यांच्याकडे सोपविले.नंदूरबार जिल्ह्यातून शहरात उच्चशिक्षण घेण्यासाठी आलेल्या एका तरूणीने प्रियकरासोबत झालेल्या वादविवादातून नाराज होत थेट आपले जीवनच संपविण्याचा टोकाचा विचार केला. त्या तरूणीने मंगळवारी (दि.१) सोमेश्वर मंदिर परिसर गाठला. मंदिरात दर्शन घेऊन ती तरूणी बोटक्लबच्या दिशेने पाय-या उतरून गेली. तेथे काही वेळ बसल्यानंतर पुन्हा उठून दुधस्थळी धबधब्याच्या दिशेने मंदिरापासून नदीकाठाने जाऊ लागली. पुन्हा माघारी येऊन काही वेळ येथील पायऱ्यांजवळील झाडाखाली बसली. तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने एका ढमाळ नावाच्या रिक्षाचालकाचे लक्ष वेधले गेले. नेहमीप्रमाणे गस्तीवर येणाºया निर्भया पथक क्रमांक-२च्या उपनिरिक्षक नेहा सुर्यवंशी यांच्याशी ढमाळ यांनी थेट संपर्क साधत माहिती दिली. यावेळी सुर्यवंशी यांनी त्यांना त्या तरूणीवर पथक पोहचेपर्यंत लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला. जुना गंगापूरनाका येथून तत्काळ सुर्यवंशी यांचे निर्भया-२चे वाहन सोमेश्वरच्या दिशेने वेगात निघाले. दुपारी ४ वाजेच्या सुमारास पथक दाखल झाल्यानंतर सुर्यवंशी यांनी त्या युवतीसोबत चर्चा करत तिचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला; मात्र तिचे रडणे काही मिनिटांपर्यंत थांबत नव्हते. अखेर त्यांनी तिचा मोबाईल ताब्यात घेऊन त्याद्वारे तिच्या जवळच्या मैत्रिणींसोबत संपर्क साधला. साधारणत: तासाभरात तिच्या मैत्रिणी तेथे पोहचल्या. तोपर्यंत सुर्यवंशी यांच्यासह त्यांच्या संपूर्ण चमूने त्या तरुणीचे समुपदेशन करत जबाबदारीचे जाणीव आणि जीवनाचे मोल पटवून देण्याचा पुरेपुर प्रयत्न केला.प्रेमवीराला ‘खाकी’ शैलीत समजसुर्यवंशी याने प्रेमवीरासोबत त्या तरूणीच्या मोबाईलवरून संपर्क करत त्याला ‘खाकी’च्या शैलीत समज दिली. त्याने तरूणीला ओळखत असल्याची क बुली त्यांनी दिली. नाशिकला आल्यानंतर तत्काळ येऊन भेटण्याची समज निर्भया पथकाने प्रेमवीराला दिली आहे. तसेच आपल्या प्रेयसीसोबत संवाद करून तिला आलेले नैराश्य दूर करण्याचाही सल्ला यावेळी त्यांनी दिला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयsomeshwar waterfallसोमेश्वर धबधबाgodavariगोदावरी