पेठ तालूक्यात स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 03:55 PM2020-09-12T15:55:48+5:302020-09-12T15:57:22+5:30

पेठ : तालुक्यातील गावंधपाडा येथील शेतकरी रविंद्र मोहन वाघमारे यांनी प्रथमच स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग सुरू केला असून सुरगाणा तालुक्याप्रमाणे आता पेठ तालुक्यातही स्ट्रॉबेरीचा गोडवा वाढणार आहे.

Strawberry farming experiment in Peth taluka! | पेठ तालूक्यात स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग !

पेठ तालूक्यात स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग !

googlenewsNext
ठळक मुद्देपेठ तालुक्यात हा पहिलाच प्रयोग कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : तालुक्यातील गावंधपाडा येथील शेतकरी रविंद्र मोहन वाघमारे यांनी प्रथमच स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग सुरू केला असून सुरगाणा तालुक्याप्रमाणे आता पेठ तालुक्यातही स्ट्रॉबेरीचा गोडवा वाढणार आहे.
तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी नुकतीच वाघमारे यांच्या स्ट्रॉबेरी पिकाची पाहणी केली असून या शेतकऱ्याने आपल्या क्षेत्रात ०.५० गुंठयावर स्ट्रॉबेरी लागवड केली आहे. सुरगाणा तालुक्यातील घोडांबे येथून स्ट्रॉबेरीचे चांडलर या जातीचे रनर विकत घेऊन १० बाय५ सेंमी अंतरावर मलचिंग व ठीबक सिंचनाचा ई आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी पणे लागवड केली.
पेठ तालुक्यात हा पहिलाच प्रयोग कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला आहे. यामुळे इतर शेतकरी याचा आदर्श घेऊन नवनवीन नगदी पिकांकडे वळतील असे तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी सांगितले.
या प्रसंगी मंडल कृषी अधिकारी मुकेश महाजन, कृषी पर्यवेक्षक किरण कडलग, बाळासाहेब महसे, रणजित आंधळे, एकनाथ वाघमारे, निवृत्ती वाघमारे, बाळु जाधव, मनोज पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते.
(फोटो १२ पेठ ०१)
गावंधपाडा येथे स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी करतांना तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे, मुकेश महाजन, किरण कडलग, रविंद्र वाघमारे आदी.

 

 

Web Title: Strawberry farming experiment in Peth taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.