शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

स्ट्रॉबेरीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना उभारी

By संजय डुंबले | Updated: January 24, 2019 01:23 IST

पारंपरिक पिकांना स्ट्रॉबेरीचा चांगला पर्याय मिळाल्याने जिल्ह्यातील आदिवासी शेतकरीही आता लाखांच्या गोष्टी करू लागले आहेत. जिल्ह्याच्या पेठ, सुरगाणा या आदिवासी तालुक्यांतील आदिवासी शेतकरी स्ट्रॉबेरी पिकाकडे वळाले असून, त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.

ठळक मुद्देआदिवासी शेतकरीही आता लाखांच्या गोष्टी करू लागलेसुरुवातीला त्यांनी पाच गुंठ्यांवर स्ट्रॉबेरीची लागवड फळधारणा झाल्यानंतर पुढे दोन महिने पीक चालू राहते.

यशकथा

नाशिक : पारंपरिक पिकांना स्ट्रॉबेरीचा चांगला पर्याय मिळाल्याने जिल्ह्यातील आदिवासी शेतकरीही आता लाखांच्या गोष्टी करू लागले आहेत. जिल्ह्याच्या पेठ, सुरगाणा या आदिवासी तालुक्यांतील आदिवासी शेतकरी स्ट्रॉबेरी पिकाकडे वळाले असून, त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. सुरगाणा तालुक्यातील घाटमाथ्यावरील घोडांबे येथील महारू विठू गांगुर्डे यांनी स्ट्रॉबेरी लागवडीतून चांगली आर्थिक कमाई केली असून, त्यांनी आता लागवड क्षेत्र वाढविले आहे.आदिवासी पट्ट्यात स्ट्रॉबेरी शेतीला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. सुरुवातीला अनुभव नसल्यामुळे कमी क्षेत्रावर घेतल्या जाणा-या या पिकाचे क्षेत्र आता वाढले आहे. तालुक्यातील एका शेतक-याने १० वर्षांपूर्वी स्ट्रॉबेरीची लागवड केली होती. ते क्षेत्र पाहण्यासाठी घोडांबे येथील महारू विठू गांगुर्डे गेले होते. तेथूनच त्यांना स्ट्रॉबेरी लागवडीची प्रेरणा मिळाली. सुरुवातीला त्यांनी पाच गुंठ्यांवर स्ट्रॉबेरीची लागवड केली. त्यावेळी त्यांना महाबळेश्वर येथून रोपे आणावी लागली होती. पाच गुंठे क्षेत्रात त्यांना १० क्विंटल स्ट्रॉबेरीचे उत्पादन मिळाले होते. गुजरात महामार्गावर त्यांनी हात विक्रीने त्याची विक्री केली. कमी लागवडीतूनही त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळाल्याने त्यांचा उत्साह वाढला आणि त्यानंतर ते गेल्या १० वर्षांपासून सातत्याने स्ट्रॉबेरीची लागवड करीत आहेत. एक एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड करण्यासाठी साधारणत: ३० ते ४० हजार रुपये खर्च येतो. त्यात मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन, रोप, खत, औषध यांचा समावेश असतो.लागवडीनंतर साधारणत: सहा महिन्यांनंतर झाडांना फळधारणा होते. फळधारणा झाल्यानंतर पुढे दोन महिने पीक चालू राहते. चांगले पीक असेल, तर आठवड्यातून दोन तोडे होतात. आठवड्याला साधारणत: तीन क्विंटल (१५० ट्रे) उत्पादन मिळते. चांगला भाव मिळाला, तर सुमारे दोन लाखांपर्यंत आर्थिक उत्पन्न या पिकातून मिळू शकते, असे गणित महारू गांगुर्डे यांनी मांडले. त्यांनी आता तीन एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड केली असून, यातून त्यांना अडीच ते तीन लाख रुपये नफा खर्च वजा जाता मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.गुजरात राज्यातील अहमदाबाद, सुरत, बडोदा या ठिकाणी ते माल विक्रीसाठी पाठवितात. या भागात माल पाठविण्यासाठी शेतकºयांना बॉक्स पॅकिंगचा खर्च करावा लागतो. एका बॉक्समध्ये साधारणत: दोन किलो स्ट्रॉबेरी बसते. या पॅकिंगचा सुमारे ४० ते ५० रुपये खर्च येतो.वयोवृद्धांना नवा रोजगारशेतकºयाला ७० ते ८० रुपये किलोचा दर मिळाला, तर स्ट्रॉबेरीची शेती फायद्याची ठरते. अनेक स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी स्वत:च हात विक्रीने मालाची विक्री करतात. यामुळे घरातील वयोवृद्धांना एक नवा रोजगारही उपलब्ध झाला आहे. पारंपरिक पिकांऐवजी आदिवासी भागात स्ट्रॉबेरी हे नगदी पीक मानले जात असून, छोट्याशा क्षेत्रात सुरुवात केली तरी हातात पैसे खेळू शकतात, असे महारू गांगुर्डे सांगतात.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी