शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पाथरेतील वीजतारा धोकादायक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:15 IST

सिन्नर तालुक्यातील पाथरे ते शहा या रस्त्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. परंतु या रस्त्यावरून गेलेल्या वीजतारा शेतकऱ्यांना, वाहनचालकांना अडचणीच्या ठरत आहे.

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे ते शहा या रस्त्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. परंतु या रस्त्यावरून गेलेल्या वीजतारा शेतकऱ्यांना, वाहनचालकांना अडचणीच्या ठरत आहे. हानी जरी मोठी नसली तरी चिंता करणारी आहे. याठिकाणी जीवित वा वित्तहानी झाली नाही. असे या अगोदरही घडले होते असे परिसरातील शेतकºयांनी सांगितले. रस्त्यावरून जवळपास एकोणावीस ठिकाणी तारा आडव्या गेल्या आहेत. त्या सर्व तारांचे अंतर कमी झाले आहे. तीन ठिकाणी रस्त्यात पोल आहे. वाहन चालवताना या ठिकाणी अपघात होऊ शकतो. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला पूर्वसूचना केली नसल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. रस्त्याच्या कामाअगोदर वीज मंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबद्दल विचारणा केली असल्याचे समजते. कोटेशनही पाठवल्याचे समजते. परंतु ही आपली जबाबदारी नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. वीज मंडळाने याअगोदर तारा ओढण्याची परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. यामुळे हा मुद्दा ऐरणीवरचा जरी असला तरी यामुळे अडचणींना सामोरे मात्र परिसरातील शेतकºयांना, वाहनचालकांना जावे लागत आहे. जीवित वा मोठी वित्तहानी झाल्यानंतर यावर तोडगा निघणार असेल तर वाईट आहे. जेव्हा या रस्त्याचे काम पूर्ण होईल आणि रहदारीचे प्रमाण वाढेल तेव्हा या तारा तुटण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतील. पाथरे ते कोळगाव रस्त्याचे कामही याच योजनेतून होत आहे. तेथेही अशीच समस्या निर्माण होणार आहे. यामुळे परिसरातील शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. यावर त्वरित उपाय काढावा, असे पाथरे, शहा, कोळगाव येथील शेतकरी व ग्रामस्थांनी मागणी केली आहे.विजेच्या तारांचे अंतर कमीपाथरे ते शहा हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पूर्ण होत आहे. या रस्त्याचे खडीकरण, मातीचा भर, डांबरीकरण यामुळे उंची वाढत आहे. परीणामी या स्त्यावरून गेलेल्या विजेच्या तारांचे अंतर कमी झाले आहे. या स्त्यावरून वाहतुकीचे प्रमाण वाढते आहे. जड, मोठी वाहने या रस्त्यावरून जात असतात. त्यामुळे या तारा तुटण्याचा प्रकार होत आहे. यातून वीज पुरवठा होत असल्याने ठिणग्या पडत आहे. नुकतेच शहा जवळील बंधाºयाजवळ तारा तुटून ठिणग्या पडून एका शेतकºयाच सरपण जळाले.

टॅग्स :Nashikनाशिक