शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

विल्होळी येथे महाराष्ट्र बँकेचा अजब कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 18:03 IST

विल्होळी : येथील बँक ऑफ महाराष्ट्रचा कारभार अजब पद्धतीने चालू असून याकडे बँकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसून येत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देएटीएममध्ये खडखडाट : कॅशियरच नसल्याने नागरिक त्रस्त

विल्होळी : येथील बँक ऑफ महाराष्ट्रचा कारभार अजब पद्धतीने चालू असून याकडे बँकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसून येत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.विल्होळी, सारूळ, राजुर बहुला, आंबे बहुला, पिंपळद, जातेगाव, रायगड नगर या ग्रामीण भागासाठी ही एकमेव बँक असल्याने येथे खातेदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यात बँकेत एकच काऊंटर असल्याने मोठ्या रांगा लागतात. असे असतानाही या बँकेत अजब व मनमानी कारभार चालू आहे.नागरीक गरज असल्याने बँक सुरु होण्या अगोदरच बँकेबाहेर रांगा लावून उभे असतात. शनिवारी (दि.१९) ग्राहकांची सकाळी नऊ वाजेपासून रांग लागलेली असताना दहा वाजेला बँक उघडली, परंतु बँकेचे व्यवस्थापक व कॅशियर दुपारी एक वाजता आल्याने ग्राहकांना तीन-चार तास ताटकळत उभे रहावे लागले.याबाबत ग्राहकांनी बँक कर्मचाऱ्यास विचारले असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. गेल्या अनेक दिवसापासून बँकेचा अजब कारभार चालू असून कधी व्यवस्थापक येत असेल तर कॅशियर येत नाही, तर कधी कॅशियर येत असेल तर व्यवस्थापक येत नाही, त्यामुळे पैशाची देवाणघेवाण करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.नवीन खाते उघडणार्‍यांना आठ ते दहा दिवस काम धंदा सोडून चकरा माराव्या लागत आहेत.बँक ग्रामीण भागात असल्याने या भागातील ग्राहकांना बँकेचे फॉर्म भरता येत नाही, त्याबाबत बँकेकडून सहकार्य केले जात नाही. परिणामी ग्राहकांना फॉर्म भरण्यासाठी गावभर फिरावे लागते.शिवाय गेल्या अनेक दिवसापासून बँक परिसरात अस्वच्छता असल्याचे दृष्य पहावयास मिळते. बँकेच्या स्वच्छतेसाठी कर्मचारी नसल्याचे सांगितले जाते. सदर बँकेची पार्किंग नसल्याने येणारी वाहने रस्त्यावर उभी राहत असून अनेक छोटे मोठेअपघात नेहमीच येथे घडत आहे. याबाबत बँकेकडे व ग्रामपंचायतीकडे सतत तक्रारी करूनही अद्यापपर्यंत पार्किंगची व्यवस्था केली गेलेली नाही.बँकेच्या एटीएमची दुर्दशा...विल्होळी पंचक्रोशित एकच केटीएम असल्याने पैसे काढण्यासाठी येथे गर्दी होते. परंतु अनेक वेळा ह्या एटीएम मध्ये खडखडाट असते त्यामुळे अनेक ग्राहकांची गैरसोय होते.सकाळी नऊ वाजेपासून बँकेच्या समोर रांगेत उभा होतो. दहा वाजता बँक उघडली. पण बँकेचे कॅशियर व व्यवस्थापक न आल्याने माझे सर्व काम सोडून मला चार तास बँकेच्यासमोर रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. बँकेची वेळ निघून गेल्यानंतर कॅशियर दुपारी एक वाजता आले. मोठी रांग असल्याने त्यामध्ये माझ्यासह अनेक नागरिकांचा त्रास सहन करावा लागला.- दिनेश रूपवते, बँक ग्राहक.

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीSocialसामाजिक