व्यापाऱ्यांकडील थकीत रकमेवर वादळी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 10:30 PM2019-09-10T22:30:53+5:302019-09-10T22:31:56+5:30

सटाणा : सटाणा मर्चंट्स को- आॅप. बॅँकेने तालुक्यातील नामपूर बाजार समितीच्या खात्यावर एक कोटी रु पये वर्ग केल्याच्या विषयासह, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे व्यापाºयाकडे अडकलेले लाखो रुपये आणि डांगसौंदाणे येथे उपबाजार निर्मितीच्या प्रस्तावावर सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सभेत वादळी चर्चा झाली.

Stormy talk on pending payments from traders | व्यापाऱ्यांकडील थकीत रकमेवर वादळी चर्चा

सर्वसाधारण सभेत बोलताना संजय सोनवणे. समवेत व्यासपीठावर प्रभाकर रौंदळ, संजय देवरे, नरेंद्र अहिरे, संजय बिरारी, जयप्रकाश सोनवणे आदी.

Next
ठळक मुद्देसटाणा बाजार समिती : वार्षिक सभा गाजली

सटाणा : सटाणा मर्चंट्स को- आॅप. बॅँकेने तालुक्यातील नामपूर बाजार समितीच्या खात्यावर एक कोटी रु पये वर्ग केल्याच्या विषयासह, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे व्यापाºयाकडे अडकलेले लाखो रुपये आणि डांगसौंदाणे येथे उपबाजार निर्मितीच्या प्रस्तावावर सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सभेत वादळी चर्चा झाली.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सभापती संजय पंडित सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. प्रशासनाने यापुढे प्रभावी संपर्क यंत्रणा राबवून शेतकºयांची जास्तीत जास्त उपस्थिती राहील. यासाठी उपस्थित शेतकºयांनी मागणी केली. सुरुवातीला चर्चेत सटाणा बाजार आवारातील कांद्याच्या लिलावातील व्यापाºयाकडे थकीत असलेले ८२ लाख रुपये तत्काळ मिळण्यासंदर्भात शेतकºयांनी मागणी केली. यावेळी माहिती देताना सभापती सोनवणे म्हणाले, संबंधित व्यापाºयाने शेतकºयांचे ३३ लाख
रु पये अदा केले आहेत. उर्वरित रक्कम २४ सप्टेंबरपर्यंत देण्याचे लेखी आश्वासन पोलीस ठाण्यात दिले असल्याची माहिती सभापतींनी दिली.
यावेळी सभापती सोनवणे यांनी डांगसौंदाणे परिसरातील आदिवासी शेतकरी कळवण व पिंपळगाव बाजार समितीत माल विक्रीस घेऊन जात असल्याने डांगसौंदाणे येथे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार निर्मितीचा प्रस्ताव मांडल्यानंतर या प्रस्तावास अनेक शेतकºयांनी विरोध करताना सांगितले की, यापूर्वी सटाणा बाजार समितीतून कळवण तसेच नंतरच्या काळात नामपूर बाजार समितीचे विभाजन करण्यात आले. यामुळे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीची सक्षमता कमी होत असल्याचे कारण दर्शवित उपस्थित शेतकºयांनी डांगसौंदाणे उपबाजार निर्मितीस विरोध केला. तसेच शेतकºयांना रोख स्वरूपात पाच ते दहा हजार रुपये देण्यात यावे यासाठी शासनाकडे मागणी करण्याची विनंती शेतकºयांनी केली.
या चर्चेत मनोहर देवरे, अण्णा काशीराम सोनवणे, अरुण सोनवणे, विनायक पाटील, जयप्रकाश सोनवणे, पांडुरंग सोनवणे, भिकानाना सोनवणे, रमेश अहिरे, सुभाष अहिरे, लक्ष्मण सोनवणे, राहुल सोनवणे, संजय पवार, अरविंद सोनवणे, जिभाऊ सोनवणे, माधव सोनवणे, शरद सोनवणे, बबन सोनवणे आदींनी सहभाग घेतला.  सभेचे इतिवृत वाचन सचिव भास्कर तांबे यांनी केले.सभेस उपसभापती प्रभाकर रौंदळ, संजय देवरे, सरदासिंग जाधव,नरेंद्र अहीरे, संजय बिरारी, श्रीधर कोठावदे, प्रकाश देवरे, पंकज ठाकरे, केशव मांडवडे, ज्ञानेश्र्वर देवरे, तुकाराम देशमुख, मधुकर देवरे, संदिप साळे, रत्नमाला सुर्यवंशी मंगला सोनवणे, वेणुबाई माळी आदी संचालकांसह शेतकरी उपस्थित होते.


शेतकºयांची अत्यल्प उपस्थिती

वार्षिक सर्वसाधारण सभेला शेतकºयांची अत्यल्प उपस्थिती होती. नामपूर बाजार समितीच्या खात्यावर समको बँकेने परस्पर १ कोटी रु पये कसे वर्ग केले असा प्रश्न उपस्थित करण्यात आला असता या रकमेसंदर्भातील प्रकरण न्यायालयात असल्याचे बँकेला कळविल्यानंतरदेखील सटाणा बाजार समितीला विश्वासात न घेता पैसे परस्पर वर्ग करण्याची कृती बँकेने केल्याचे स्पष्टीकरण सभापतींनी केले.

Web Title: Stormy talk on pending payments from traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक