शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या वराती थांबल्याने घोडा दावणीला; व्यावसायिकांवर आली उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 00:17 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी झाल्याने सर्व व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्याचा फटका लग्नसराईलाही बसला आहे. विवाह समारंभ छोटेखानी करण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याने थाटमाट होत नाही. त्यामुळे घोड्यावरून काढण्यात येणाऱ्या वरात, मिरवणुका बंद झाल्याने घोड्यांचा सांभाळ करणारे व्यावसायिक अडचणी आले आहेत.

ठळक मुद्देकोरोनाचा फटका : उपस्थितीची मर्यादा वाढवूनही विवाह पार पडतात साध्या पद्धतीनेच

आकाश गायखे । चांदोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी झाल्याने सर्व व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्याचा फटका लग्नसराईलाही बसला आहे. विवाह समारंभ छोटेखानी करण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याने थाटमाट होत नाही. त्यामुळे घोड्यावरून काढण्यात येणाऱ्या वरात, मिरवणुका बंद झाल्याने घोड्यांचा सांभाळ करणारे व्यावसायिक अडचणी आले आहेत.लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात शासनाने शिथिलता दिली आहे. त्यामुळे ५० मंडळींच्या उपस्थितीत विवाह समारंभ करण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी २० मंडळींच्या उपस्थितीत विवाह समारंभ पार पडत होते. आता वºहाडींची संख्या वाढवली असली तरी अगदी साध्या पद्धतीने विवाह पार पडत आहेत.वास्तविक पाहता, विवाह समारंभ म्हटला की मोठा बडेजावपणा असतो. प्रत्येक जण किती मोठे कर्ज झाले तरी चालेल असे म्हणत थाटामाटात लग्न समारंभ करतात. वराची वरात काढण्यासाठी खास घोडा मागविला जातो. नाशिक शहरासह ग्रामीण भागात विवाहसमारंभात मिरवणुकीला घोडा भाड्याने उपलब्ध करून देणारे अनेक व्यावसायिक आहेत. मार्च, एप्रिल, मे व जून हा कालावधी लग्नसराईचा असतो, मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियम घातल्याने अडचण निर्माण झाली आहे.विवाहापूर्वी वराची घरापासून ते लग्न मांडवापर्यंत मिरवणूक काढली जात असे. तासभर वापरण्यात येणाºया शाही घोड्यासाठी साधारणत: पाच ते सहा हजारापर्यंत भाडे आकारले जायचे. परंतु यंदा मिरवणूक बंद असल्याने घोडे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकmarriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या