शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजूर महिलांचा प्रकाशा मार्गावर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:44 IST

येथील विंचूर-प्रकाशा महामार्गावर पोलिसांनी गाडी अडवली म्हणून शेतमजूर महिलांनी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ठिय्या आंदोलन सुरू केल्याने वाहतूक खोळंबली होती. शहरातील नागरिकांनी पोलीस व महिलांची समजूत घातल्याने सुमारे अर्धा तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.

देवळा : येथील विंचूर-प्रकाशा महामार्गावर पोलिसांनी गाडी अडवली म्हणून शेतमजूर महिलांनी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ठिय्या आंदोलन सुरू केल्याने वाहतूक खोळंबली होती. शहरातील नागरिकांनी पोलीस व महिलांची समजूत घातल्याने सुमारे अर्धा तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.  देवळा तालुक्याचा पूर्व भाग तसेच मालेगाव, चांदवड आदी तालुक्यांतील शेकडो शेतमजूर दुष्काळामुळे देवळा तालुक्याच्या पश्चिम भागात दररोज रोजगारासाठी पीकअप, रिक्षा आदी खासगी वाहनांतून येतात. दिवसभराचे काम आटोपून सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास घरी परतत असताना देवळा शहरातील विंचूर-प्रकाशा महामार्गावर मालेगाव नाक्यावर देवळा वाहतूक पोलिसांनी त्यांची गाडी अडवून कागदपत्रांची मागणी केली व अवैध प्रवासी वाहतूक केल्याबद्दल चालकावर दंडात्मक कारवाई केली. त्यावेळी गाडीतील मजूर महिलांनी आम्हाला घरी लवकर जाऊ द्या, अशी विनंती केली. वाहनातून अनधिकृत प्रवासी वाहतूक केली म्हणून दंड भरल्याशिवाय गाडी सोडणार नाही अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याने संतप्त महिलांनी रस्त्यातच ठिय्या दिला. यामुळे तणाव निर्माण झाला होता. शहरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होऊन वाहनधारकांची व पोलिसांची धावपळ उडाली. दरम्यान, मजुरांची वाहतूक करणाऱ्या इतर वाहनचालकांना पोलीस दंडात्मक कारवाई करत असल्याची माहिती मिळताच त्यांनी आपल्या गाडीतील मजुरांना कळवण नाक्यावर उतरवून दिले व मालेगाव नाक्याच्या पुढे शहराबाहेर पायी जाण्यास सांगितले. यामुळे शहरातून मजुरांचे जत्थे जात असल्याचे चित्र होते.यावेळी देवळा बाजार समितीचे माजी सभापती अशोक अहेर, संतोष शिंदे, सुनील अहेर आदींसह शेतकºयांनी पोलिसांच्या या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली व पोलिसांना सामंजस्याची भूमिका घेण्याची विनंती केली. पोलिसांनी समझदारी दाखवल्याने कटू प्रसंग टळला व अर्धा तास ठप्प झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली.सध्या दुष्काळी स्थिती निर्माण झाली असल्याने शेजारील तालुक्यातील आदिवासी महिला रोजगारासाठी विविध वाहनांनी देवळा तालुक्यात येतात. त्यांना त्रास देऊ नये अशी विनंती नागरिकांनी पोलीस प्रशासनाला केली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीWomenमहिलाTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस