लोकमत न्यूज नेटवर्क निफाड : विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकरी उद्यापासून (दि. १) संपावर जात आहेत. संपाच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांनी पंढरपूर येथे शेतकरीविरोधी केलेल्या वक्तव्याचा नैताळे व परिसरातील शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला. शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीचे संचालक राजेंद्र डोखळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोरगुडे, नवनाथ बोरगुडे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक -औरंगाबाद महामार्गावर सकाळी रास्ता रोको करण्यात आला. पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांना निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.शेतकऱ्याच्या संपामुळे सरकारला कोणताही फरक पडणार नाही. अन्न धान्य कमी पडले तर आयात करु असे बोलून भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावर निफाड तालुक्यातील शेतकरी वर्गांकडून संताप व्यक्त करण्यात आला. संतापलेल्या शेतकऱ्यांनी शेतकरी नेते राजेंद्र डोखळे, राजेंद्र बोरगुडे, नवनाथ बोरगुडे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक -औरंगाबाद महामार्गावर नैताळे येथे रास्ता रोको केला. यावेळी राजेंद्र डोखळे, रतन बोरगुडे, श्रीमती घुमरे यांनी भाषणे केली. आंदोलकांनी निवेदन पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन माघे घेतले. या आंदोलनात रतन बोरगुडे, सदाशिव कोटकर, रवींद्र बोरगुडे, गोविंद घायाळ, बापू भवर, दिलीप घायाळ, दत्तू भवर, भाऊसाहेब घुमरे, अजित मोगल, संदीप बोरगुडे, संजय गोळे, सोपान बोरगुडे, गणपत बोरगुडे, नवनाथ बोरगुडे, प्रशांत पवार, सुभाष बोरगुडे, राहुल बोरगुडे, ज्ञानेश्वर घायाळ, बाबाजी बोरगुडे, सूर्यभान दादा, दत्तात्रेय मोरे, गोविंद बोरगुडे आदी सहभागी झाले होते.
संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By admin | Updated: June 1, 2017 01:23 IST