शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षांचे पाणी रोको आंदोलन : रामकुंडात पाण्यात उतरून घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:49 IST

गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयाला सत्ताधारी भाजपा वगळता मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व माकपा या सर्वपक्षीयांनी एकत्र येत विरोध दर्शवित पाणी सोडण्यास कडाडून विरोध केला आहे. शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाचा विचार न करता परस्पर घेतलेल्या निर्णयाचा निषेध म्हणून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. २४) दुपारी रामकुंडात पाण्यात उतरून घोषणाबाजी करीत सत्ताधारी भाजपा तसेच शासनाचा निषेध नोंदविला.

पंचवटी : गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयाला सत्ताधारी भाजपा वगळता मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व माकपा या सर्वपक्षीयांनी एकत्र येत विरोध दर्शवित पाणी सोडण्यास कडाडून विरोध केला आहे. शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाचा विचार न करता परस्पर घेतलेल्या निर्णयाचा निषेध म्हणून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. २४) दुपारी रामकुंडात पाण्यात उतरून घोषणाबाजी करीत सत्ताधारी भाजपा तसेच शासनाचा निषेध नोंदविला.  यावेळी सर्वपक्षीयांनी गोदावरीची महाआरती केली. नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी घेतला. सदरचा निर्णय घेताना नाशिकच्या नागरिकांना पिण्यासाठी लागणाºया पाण्याचा अंदाज घेतलेला नाही तसेच नाशिकच्या जनतेसाठी धरणातून पाणी आरक्षित केलेले नाही.यावेळी धरण उशाशी कोरड घशाशी, पाणी नाही कुणाच्या बापाचे ते तर आमच्या हक्काचे, नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी अशा घोषणा दिल्या. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, मनसे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, मनपा विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, माजी महापौर अशोक मुर्तडक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेनेचे महानगरप्रमुख महेश बडवे, विलास शिंदे, माकपचे श्रीधर देशपांडे, गजानन शेलार, शाहू खैरे, राजेंद्र बागुल, पूनम मोगरे, वैशाली भोसले, दिगंबर मोगरे, प्रवीण भाटे, खंडू बोडके आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी नाशिकला येऊन नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा केली होती. यंदाच्या वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यातच आता जायकवाडीला पाणी देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. नाशिकचे पाणी नाशिकच्या जनतेसाठी असून, हे हक्काचे असल्याने कुणालाही देऊ नये. दत्तक नाशिकला सत्ताधारीच सावत्रपणाची वागणूक देत असल्याने नाशिक दत्तक की सावत्र असा प्रश्न तमाम नाशिककरांना पडला आहे. नाशिकचे पाणी जायकवाडीला सोडल्यास आंदोलन छेडण्यात येईल.- अ‍ॅड. राहुल ढिकले, मनसे प्रदेश उपाध्यक्षदुष्काळजन्य परिस्थितीयंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे असे असतानाही जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला गेल्याने सत्ताधारी वगळता सर्वपक्षीयांनी एकत्र येत पाणी सोडण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व माकपा पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रामकुंडावर एकत्र येत पाण्यात उतरून हातात फलक घेत शासनाचा व सत्ताधारी पक्षाचा निषेध नोंदविला.

टॅग्स :godavariगोदावरीMarathwadaमराठवाडाWaterपाणीgangapur damगंगापूर धरण