इगतपुरी : दादर येथील ऐतिहासिक आंबेडकर भवन जमीनदोस्त केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने भाजपा सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत इगतपुरीत सकाळी साडेदहा वाजता लोकमान्य टिळक - हरिद्वार साकेत एक्स्प्रेस अडवून रेल रोको करण्यात आला. यावेळी इगतपुरीचे स्टेशन मास्तर व्ही.आर. जाधव यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.रेल रोकोप्रसंगी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, पोलीस निरीक्षक संजय शुक्ला, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक सतीश विधाते, यांच्यासह लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.या आंदोलनात राजेंद्र गुप्ता, मनोज मोरे, प्रवीण जगताप, भीमसेन चंद्रमोरे, संजय वाघ, संतोष चिकणे, राजेंद्र दोंदे, गिरीश वानखेडे, संतोष सोनवणे, विजय खवळे, रॉबी गिल्डर, बाबूराव गतीर, बंडू उबाळे, दिनकर पवार, हरीष पराड, लीला बिऱ्हाडे, शैला दोंदे, लक्ष्मी साळवे, सुनीता उघाडे यांच्यासह भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, रिपाइं पक्ष, सामाजिक संघटनेचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)
इगतपुरीत आदिवासी सेनेचा रेल रोको
By admin | Updated: June 29, 2016 00:02 IST