शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शेतीत पाणी घुसल्याने संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 22:44 IST

निफाड : नाशिक - औरंगाबाद मार्गावरील शिवरे फाट्याजवळ बुजवलेला फरशी पूल तातडीने खोदून स्वच्छ करावा यासाठी श्रीरामनगर, रामपूर, सोनेवाडी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शनिवारी रास्ता रोको आंदोलन केले. त्याचक्षणी जेसीबीच्या साहाय्याने पूल खोदून मोकळाकरण्यात येऊन तुंबलेल्या पाण्याला वाट काढून दिल्याने वाहतूक सुरळीत झाली तसेच शेतीतील पाण्याचाही निचरा झाला.

ठळक मुद्देनाशिक - औरंगाबाद महामार्गावर शिवरे फाट्याजवळ फरशी पुलावर पाणी;पाटबंधारे विभागाने तातडीने काम केल्याने रस्ता खुला

निफाड : नाशिक - औरंगाबाद मार्गावरील शिवरे फाट्याजवळ बुजवलेला फरशी पूल तातडीने खोदून स्वच्छ करावा यासाठी श्रीरामनगर, रामपूर, सोनेवाडी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शनिवारी रास्ता रोको आंदोलन केले. त्याचक्षणी जेसीबीच्या साहाय्याने पूल खोदून मोकळाकरण्यात येऊन तुंबलेल्या पाण्याला वाट काढून दिल्याने वाहतूक सुरळीत झाली तसेच शेतीतील पाण्याचाही निचरा झाला.तालुक्यातील श्रीरामनगर, रामपूर, सोनेवाडी परिसरातून वेगाने वाहून येणारे पावसाचे पाणी वाहून जावे म्हणून रस्ता तयार करताना शिवरे फाट्याजवळ फरशी पूल करत आला होता.मात्र काही वर्षांपूर्वी कोणीतरी सदर पूल माती टाकून बुजविल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात महामार्गावर साचून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वाढले होते. सदर पूल खुला करावा याबाबत मागणी करण्यात येत होती, मात्र दखल घेतली जात नव्हती. अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागावा म्हणून नुकसानग्रस्त शेतकºयांनी शिवरे फाटा येथे सकाळी ११ वाजता रास्ता रोको केला. ही माहिती मिळताच आमदार दिलीप बनकर, तहसीलदार दीपक पाटील व इतर अधिकाºयांनी तातडीने धाव घेत, शेतकºयांच्या भावना लक्षात घेऊन तहसीलदार पाटील यांनी बांधकाम विभागाला सूचना दिल्या.वाहतुक ठप्पगत १५ दिवसांपासून या रस्त्यावर प्रचंड पाणी साचून वाहतूक ठप्प होण्याबरोबरच परिसरातील शेतीत पाणी घुसून पिकांचे नुकसान होत होते. शनिवारी मोठ्या स्वरूपात पाऊस झाल्याने येथे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारकांचा संताप झाला. प्रशासकीय अधिकाºयांनी तातडीने जेसीबी मशीन बोलावून घेत या फरशी पुलामधील (मोरी) दगड, माती बाहेर काढून रस्त्याच्या बाजूला व शेतीत तुंबलेले पाणी वेगाने वाहून वाहतूक सुरळीत झाली. तसेच शेतीत साचलेले पाणीही कमी झाले.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस