शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त शेतकऱ्यांचा निफाडला रास्ता रोको

By admin | Updated: March 5, 2017 01:07 IST

निफाड : कांदा लिलाव सुरू न केल्याने कांदा लिलावासाठी आलेल्या कांदा उत्पादकांनी मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर निफाड पिंपळगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले

 निफाड : रेल्वेच्या रॅक ठरावीक कांदा व्यापाऱ्यांनाच मिळत असल्याने निफाड येथील अन्याय झालेल्या कांदा व्यापाऱ्यांनी शनिवारी कांदा लिलाव सुरू न केल्याने कांदा लिलावासाठी आलेल्या संतप्त कांदा उत्पादकांनी निफाड येथील मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर दुपारी निफाड पिंपळगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.तालुक्यात हंगामात लाल कांद्याचे प्रचंड उत्पादन झाले आहे. तालुक्यातील काही व्यापाऱ्यांनी रेल्वेच्या ५० रॅक बुक केल्या आहेत अशा परिस्थितीत ५१ वी रॅक बुक केली तर आमचा नंबर २ महिन्यांनी येईल त्यामुळे लिलावात घेतलेला कांदा आणि यापुढे घेण्यात येणारा कांदा करायचा काय ? असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाल्याने आम्ही कांदा लिलाव बंद केला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. काही मातब्बर व्यापाऱ्यांच्या अतिरिक्त रॅक बुकिंग मुळे सायखेडा आणि निफाड येथील व्यापाऱ्यांना लिलावात घेतलेला कांदा पाठविण्यासाठी व्यवस्था नसल्याने त्यांनी लिलाव बंद केला आहे .व्यापारीवर्गात असलेल्या संघर्षामुळे कांदा लिलावासाठी आणलेल्या शेतकऱ्यांचा संताप झाला, त्यांनी निफाड मार्केट यार्ड प्रवेशद्वारासमोर निफाड पिंपळगाव रस्त्यावर रास्ता रोको करीत संताप व्यक्त केला. यावेळी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, उपसभापती सुभाष कराड, संचालक बाळासाहेब क्षीरसागर यांनी तातडीने धाव घेतली व व्यापाऱ्यांशी चर्चा केली. व्यापारी कांदा लिलाव प्रक्रि या सुरू करणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी निफाडचे पोलीस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनात निफाडचे उपनगराध्यक्ष जावेद शेख, निफाड शहर शिवसेना प्रमुख संजय कुंदे, नगरसेवक दिलीप कापसे, सचिन गिते यांच्यासह शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. रेल्वे मंत्रालयाने सध्या कांद्याची आवक पाहून रेल्वेच्या अधिक रॅक उपलब्ध कराव्यात यासाठी लासलगाव बाजार समितीने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना निवेदन दिल्याची माहिती उपसभापती सुभाष कराड यांनी दिली. (वार्ताहर)