शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

रोक डअभावी एटीएम ओस

By admin | Updated: April 23, 2017 02:34 IST

नाशिक : नोटाबंदीनंतर निर्माण झालेली चलन तुटवड्याची परिस्थिती पुन्हा एकदा नाशिककरांना अनुभवयास मिळत आहे.

 नाशिक : नोटाबंदीनंतर निर्माण झालेली चलन तुटवड्याची परिस्थिती पुन्हा एकदा नाशिककरांना अनुभवयास मिळत आहे. रिझर्व्ह बँकेने नाशिक जिल्ह्यासाठी ५० कोटी रुपये उपलब्ध करून दिले असले तरी प्राप्त चलन अवघे दोन दिवसांतच रोकडअभावी एटीएम ओस पडली असल्याचे चित्र सध्या शहरात निर्माण झाले आहे. शहरातील एटीएममधील खडखडाटामुळे नागरिकांना वाढत्या उन्हासोबतच चलनटंचाईचा तापही सहन करावा लागणार आहे. शहरातील चलनटंचाईबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू असून, एकीकडे नागरिकांना अधिकाधिक कॅशलेस व्यवहारांकडे वळविण्यासाठी आरबीआयकडून जाणीवपूर्वक रोकड दिली जात नसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे तर रोख व्यवहारावरील सेवाकर आकारण्यासाठी बँकांकडून जाणीवपूर्वक एटीममध्ये रोकड जमा करण्याचे टाळून ग्राहकांची कोंडी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा मतप्रवाहही व्यक्त होत आहे. नोटाबंदीच्या काळात चलनटंचाई निर्माण झाल्यामुळे एटीएमसमोर रांगा लागत होत्या. परंतु, सध्या स्थिती वेगळी आहे. बहुतेक एटीएमबाहेर बंदचे फलक लागलेले नसले तरी एटीएममध्ये पैसेच मिळत नाही. तांत्रिक अडचणींमुळे व्यवहार पूर्ण होत नसल्याची प्रतिक्रिया एटीममधून प्राप्त होत असल्याने ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरत आहे. पंतप्रधानांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर सहा महिने उलटले तरीही आर्थिक व्यवहार पूर्वपदावर आले नाहीत. नाशिक जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून चलनाची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ५० टक्क्यांवर एटीएमही बंद झाले आहेत. (प्रतिनिधी)