शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड  तालुक्यातील  दिवसाचे भारनियमन बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:07 IST

तालुक्यातील दिवसातील भारनियमन बंद करून ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी सिंगल फेज लाइट सुरळीत करण्यात यावी, निमोण येथे सबस्टेशन सुरू करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.

चांदवड : तालुक्यातील दिवसातील भारनियमन बंद करून ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी सिंगल फेज लाइट सुरळीत करण्यात यावी, निमोण येथे सबस्टेशन सुरू करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.चांदवड पंचायत समितीच्या आमसभेत विविध समस्यांवर चर्चा झाली तर पाणी, वीज, रस्ते यावर चर्चा करताना विजेच्या संदर्भात शेतकरी संतप्त झाले. शेतीला पाणी येण्यासाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा रुग्णांना चांगली मिळत नसल्याने यासाठी येत्या मार्च महिन्यात स्वतंत्र बैठक घेऊन नागरिकांच्या समस्या सोडविणार असल्याचे आमदार डॉ. अहेर यांनी सांगून अशा प्रकारच्या विविध मुद्द्यांवर सभेत अनेकांनी तक्रारींचा पाढाच वाचला. मीटर रीडिंगचे काम बचत गटाला ठेका द्यावा अशी मागणी नांदूरटेकचे सरपंच प्रभाकर  ठाकरे यांनी केली. कृषी विभागाच्या विषयात मागेल त्याला शेततळे या योजनेत अवघ्या पन्नास  हजार रुपयांमध्ये शेततळे होत नाही, त्यास दोन लाखांपर्यंत निधी  द्यावा, अशी मागणी वडनेरभैरवचे उपसरपंच रावसाहेब भालेराव यांनी केली. सामाजिक वनीकरणाच्या कामांचा आढावा सादर करण्यात आला. भूमिअभिलेखचा विषय चांगला गाजला. त्यात मोजणीसाठी पैसे व जाण्या-येण्याचा खर्च मागितला जातो, असा आरोप उपस्थितांनी करताच भूमिअभिलेख अधिकारी राजेंद्र कपोते यांनी लेखी द्या असे सांगताच आमदार डॉ. अहेरांनी त्यांना खडे बोल सुनावत म्हणजे येथील सभेत नागरिक काय खोट्या तक्रारी करतात काय? असे सुनावले व पैसे मागणाºया त्या कर्मचारी किंवा दलालावर त्वरित गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. माजी उपसभापती मधुकर अण्णा जाधव यांनी पोल्ट्री व्यवसायाला कृषी विभागामार्फत मदत करावी अशी मागणी केली, तर यावेळी सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, नितीन अहेर, कारभारी अहेर, अमोल भालेराव, बाकेराव जाधव, माजी उपसभापती मधुकर अण्णा जाधव, रावसाहेब भालेराव, अन्वर शहा, अशोक भोसले, विजय पुंजाराम जाधव, मधुकर जाधव, निवृत्ती शिंदे, भीमराव जेजुरे, भीमराव निरभवणे, सोमनाथ पगार, प्रभाकर ठाकरे, विजय गांगुर्डे, योगेश ढोमसे, संदीप काळे, विलास भवर, डॉ. दिलीप शिंदे, शरद पाटील, सुभाष पूरकर, विजय पगार यांनी आपापल्या भागातील वीज, पाणी, रस्ते, भूमिअभिलेख, तहसील कार्यालय, मोजणी आदी समस्या मांडल्या.  प्रास्ताविक गटविकास अधिकारी हिरामण मानकर यांनी केले, तर सूत्रसंचालन जर्नादन देवरे, सुनील सोनवणे यांनी केले. यावेळी एस.टी. महामंडळाचे दत्तप्रसाद बागुल, कृषी अधिकारी राजेंद्र साळुंके, विजय पवार, भूमिअभिलेखचे राजेंद्र कपोते, बालविकास प्रकल्प अधिकारी गजानन शिंदे, सहायक निबंधक सविता शेळके, कुंदन दंडगव्हाळ, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक यांनी आपापल्या विभागाच्या समस्यांचे निराकरण केले.गेल्या आठवड्यात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यांच्याकडे इन्फ्रा एकची कामे मंजूर आहेत. एरियावाइज ती कामे एकाच ठेकेदाराला दिली होती, त्यामुळे ती कामे बंद असून, शासनाने त्यांना काळ्या यादीत टाकले आहे. लवकरच कामास सुरुवात होणार आहे. यामुळे ३०० मेगावॉट वीज उपलब्ध होईल. यावेळी शेतकºयांना दिवसा वीज उपलब्ध होऊ शकते . - डॉ. राहुल अहेर, आमदार

टॅग्स :Nashikनाशिक