शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

नांदगावी विद्यार्थिनींचा बस रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 14:21 IST

नांदगांव : आगारातले विद्यार्थ्यांसाठी असलेले पास संपले.... पास नसल्याने बसमध्ये वाहकाकडून हिडीसफिडीस वागणूक मिळते. प्रसंगी उतरवून दिले जाते. अशा तक्र ारी घेऊन न्यू इंग्लिश स्कूलच्या सुमारे २५० विद्यार्थिनींनी बस स्टेशन मध्ये जाऊन बसेसचा मार्ग रोखल्याने परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली.

नांदगांव : आगारातले विद्यार्थ्यांसाठी असलेले पास संपले.... पास नसल्याने बसमध्ये वाहकाकडून हिडीसफिडीस वागणूक मिळते. प्रसंगी उतरवून दिले जाते. अशा तक्र ारी घेऊन न्यू इंग्लिश स्कूलच्या सुमारे २५० विद्यार्थिनींनी बस स्टेशन मध्ये जाऊन बसेसचा मार्ग रोखल्याने परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. १५ सप्टेंबर रोजी नांदगाव आगारात पास संपले. तेच पास वापरा असा अनाहूत सल्ला विद्यार्थ्यांना दिला गेला. मात्र प्रत्यक्षात वेगवेगळ्या वाहकांनी वेगळी वागणूक दिल्याने विद्यार्थी अपमानित व निराश झाले. गुरूवारी नवीन पास शिवाय गाडीत चढू दिले जात नव्हते. म्हणून विद्यार्थी संतापले व त्यांनी थेट बस स्थानकावर येऊन हल्लाबोल केला. तेव्हा कुठे प्रशासनास जाग आली व त्यांनी नवीन पास जारी करण्यास सुरवात करण्यात आली. रास्ता रोको केल्याने आगार प्रमुख दिलीप जाधव त्वरेने बस स्थानकावर पोहोचले. त्यांनी पास संपल्याचे मान्य केले. परंतु वाहकांना या संदर्भात सांभाळून घेण्याची सूचना दिली होती. हिसवळ येथे बसच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना ‘कट’ मारून बस पुढे निघून गेली. आज आमची चांचणी परीक्षा होती. काही वेळाने इंधनाची वाहतूक करणारा टॅँंकर आला. त्यात बसून आम्ही नांदगावला आलो अशी माहिती विद्या संजय हिने दिली. काही वेळेस अर्ध्या रस्त्यामध्ये उतरवून देतात. एखाद्यावेळेस तिकीट काढायला लावतात अशाही तक्रारी विद्यार्थिनींनी मांडल्या. सविता शिंदे हिंगणवाडी, जळगावची जगधने, वाखारीची जान्हवी ठोके आदींनी तक्र ारी मांडल्या. 

टॅग्स :Nashikनाशिक