शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा बॅँकेच्या भगूर शाखेत पैसे वाटप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 18:27 IST

लोकमत न्युज नेटवर्क नाशिक : येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतून गेल्या एक महिन्यापासून खातेदारांना पैसे देण्याचे बंद ...

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक: येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतून गेल्या एक महिन्यापासून खातेदारांना पैसे देण्याचे बंद करण्यात आले असून, त्यामुळे परिसरातील खातेधारकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. एवढेच नव्हे तर ठेवींची मुदत संपल्यानंतरही त्याची रक्कम देण्याऐवजी त्या ठेवी पुन्हा नूतनीकरण करण्याचा आग्रह बॅँकेच्या अधिकाऱ्यांकडून धरला जात आहे.नोटाबंदीनंतर जिल्हा बॅँकेच्या भगूर शाखेतून खातेदारांना मोठी रक्कम मिळत नसली तरी, दोन ते तीन हजार रुपये बॅँकेतून काढता येत असल्याने खातेदारांची फारशी ओरड नसली तरी, गेल्या एक महिन्यापासून बॅँकेने आता तेवढीही रक्कम देणे बंद करून टाकत, पैशांसाठी नाशिकच्या मुख्यालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. या संदर्भात खातेदार अंबादास जिवराम आडके यांनी त्यांच्या पन्नास हजार रुपयांच्या ठेवीची मुदत संपुष्टात आल्याने बॅँकेकडे पैसे परतीची मागणी केली असता, शाखा प्रबंधक ए. बी. पानसरे यांनी त्यांना पैसे शिल्लक नसल्याचे कारण देत मुदत ठेवीचे नूतनीकरण करण्याचा सल्ला दिला. पैसे हवेच असतील तर बॅँकेच्या मुख्य कार्यालयाकडे मागणी करा, असे सांगितले. त्यावर आडके यांनी त्यांच्याकडे लेखी देण्याची मागणी केली व चुकीच्या पद्धतीने बॅँकेने कर्ज वाटप केले व ते वसूल होत नसल्याने त्याचा खातेदारांना त्रास का असा सवाल केला. अखेर वाद वाढू लागल्याचे पाहून प्रबंधक पानसरे यांनी २५, २५ हजाराचे दोन चेक देऊन आरटीजीएस केले व पैसे नंतर खात्यात वर्ग होणार असे सांगितले.दरम्यान या संदर्भात शाखा प्रबंधक ए. बी. पानसरे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, कर्जदाराकडून कर्ज वसुलीचा विशेष प्रयत्न सुरू असून, बँकेच्या मुख्य शाखेत पैसे वाटप चालू असते. सध्या पैशांच्या कमतरतेमुळे भगूर शाखेतून पैसे वाटप बंद करण्यात आले आहे. एक महिन्यापासून ग्राहकांचा वीज बिल भरणा शाखेत स्वीकारला जात आहे. 

टॅग्स :bankबँकNashikनाशिक