शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

संतप्त मनेगावकरांचे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 17:53 IST

सिन्नर : मनेगाव गावासह वाड्यावस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असतांना प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करीत मनेगाव ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी अचानक नाशिक-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

सिन्नर : मनेगाव गावासह वाड्यावस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असतांना प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करीत मनेगाव ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी अचानक नाशिक-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या रास्ता रोको आंदोलनात अडकलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांची समस्या जाणून घेत जिल्हाधिकाऱ्यांसोबत फोनवरुन चर्चा करुन तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. दोन दिवसात टॅँकर सुरु करण्याचे आश्वासन या बैठकीत मिळाले.मनेगाव येथे गेल्या वर्षापासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांसह वाड्या-वस्त्यांवर राहणाºया ग्रामस्थांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. मनेगावसह सोळागाव नळपाणीपुरवठा योजनेत गावाचा समावेश असून योजनेचे पाणी वाड्यावस्त्यांवर अद्यापर्यंत पोहचले नाही. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने वस्तीवरील विहीरींनी तळ गाठला आहे. परिसरात पाण्याचा कुठेच स्त्रोत नसल्याने महिलांना व ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गत वर्षापासून वाड्यावस्त्यांचे टॅँकर बंद असल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी १ सप्टेंबर रोजी तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन टॅँकर सुरु करण्यासह मनेगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी गावापर्यंत पोहचविण्याची मागणी केली होती. निवेदन देतांनाच आठ दिवसात टॅँकर सुरु न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र निवेदन देऊनही १५ दिवस उलटल्यानंतर प्रशासनाकडून दखल घेतली न गेल्याने ग्रामस्थांच्या संतापात भर पडली.राष्टÑवादी कॉँग्रेसचे राजाराम मुरकुटे यांच्या नेतृत्त्वाखाली सकाळी १० वाजेच्या सुमारास महिला व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात टाळे ठोकले. त्यानंतर महिला व ग्रामस्थांनी नाशिक-पुणे महामार्गावर गुरेवाडी फाट्यावर जावून सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अचानक रास्ता रोको आंदोलनास प्रारंभ केला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक साहेबराव पाटील यांच्यासह कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेवून आंदोलनकर्त्यांनी महामार्गावर हटविण्याचा प्रयत्न केला. याचवेळी रास्ता रोको आंदोलनात अडकलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील अर्धा किलोमीटर पायी चालत आले व त्यांनी मनेगावच्या आंदोलकर्त्यांसोबत संवाद साधला.गेल्या अनेक दिवसांपासून मनेगावकर टंचाईचा सामना करीत असून पाणीयोजनेचा बोजवारा उडाल्याने व टॅँकर सुरु होत नसल्याने ग्रामस्थांना रास्ता रोको आंदोलन करण्याची वेळ आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जिल्हाधिकाºयांना फोन लावून आंदोलनाची माहिती दिली. पाणीप्रश्न मिटविण्यासाठी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने बैठक लावण्याची सूचना त्यांनी केली. ग्रामस्थांची समजूत काढून आंदोलन मागे घेण्याची विनंती त्यांनी केली. त्यानंतर चार-पाच ग्रामस्थांना जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीस येण्यास सांगितले.विखेपाटील यांनी घेतली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकदुपारी राधाकृष्ण विखेपाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, प्रांताधिकारी महेश पाटील, सिन्नरचे तहसीलदार नितीन गवळी, गटविकास अधिकारी लता गायकवाड, महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीस राजाराम मुरकुटे, अ‍ॅड. संजय सोनवणे यांच्यासह मनेगावचे काही ग्रामस्थ उपस्थित होते.दोन दिवसात वाड्या-वस्त्यांना सुरु होणार टॅँकरमनेगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी दुरुस्त करण्यासह योजनेचे पाणी तीन दिवसातून मनेगाव येथे पोहचले पाहिजे, यासाठी मजीप्रच्या अधिकाºयांनी लक्ष घालावे व दोन दिवसांत टॅँकर सुरु करावा अशा सूचना विखे-पाटील यांनी केल्या. जिल्हाधिकाºयांनीही टॅँकर सुरु करण्यासाठी आश्वासन दिले. त्यामुळे येत्या दोन दिवसात वाड्या-वस्त्यांवर टॅँकरने पाणी सुरु होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.ग्रामपंचायत कार्यालयास टोकले टाळेपंधरा दिवसांपूर्वी तहसील कार्यालय व पंचायत समितीला निवेदन देऊनही टॅँकर सुरु होत नसल्याने महिला व ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनापूर्वी मनेगाव ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकून आपला रोष व्यक्त केला. यावेळी राजाराम मुरकुटे यांच्यासह मयूर शिरसाठ, मदन सोनवणे, भानुदास सोनवणे, सूरज सोनवणे, दिगंबर सोनवणे, संजय गांजवे, भाऊसाहेब शिंदे, सुमन शिंदे, भागाबाई सोनवणे, अनिता सोनवणे, मधुकर सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. त्यानंतर महामार्गावर सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

टॅग्स :Strikeसंप