शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाजे येथे सरपंच निवडणुकीत दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 00:49 IST

दिंडोरी : तालुक्यातील सरपंच-उपसरपंच निवडणुकीला गालबोट लागले असून महाजे येथे सरपंचपदाच्या महिला उमेदवारावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली असून पोलिसांनी वेळीच धाव घेत सदर महिला सरपंचाचा जीव वाचवत पुढील अनर्थ टळला. मात्र, विरोधी गटाच्या दगडफेकीत सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह पाच पोलीस व काही ग्रामस्थ जखमी झाले आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी वाचविले सरपंचांचे प्राण : पाच पोलिसांसह ग्रामस्थ जखमी

दिंडोरी : तालुक्यातील सरपंच-उपसरपंच निवडणुकीला गालबोट लागले असून महाजे येथे सरपंचपदाच्या महिला उमेदवारावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली असून पोलिसांनी वेळीच धाव घेत सदर महिला सरपंचाचा जीव वाचवत पुढील अनर्थ टळला. मात्र, विरोधी गटाच्या दगडफेकीत सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह पाच पोलीस व काही ग्रामस्थ जखमी झाले आहे. दरम्यान, कडक पोलीस बंदोबस्तात निवडणूक प्रक्रिया पार पडत सरपंचपदी रुपाली सोमनाथ भोये तर उपसरपंचपदी कविता ज्ञानेश्वर इंगळे यांची निवड झाली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील महाजे ग्रुपग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडणुकीसाठी तहसीलदार पंकज पवार यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी भोये यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.महाजे येथील ग्रुप ग्रामपंचायतींतर्गत सादराळे व शृंगारपाडा येथील सदस्यांचे बहुमत असल्याने येथील सरपंच, उपसरपंच निवड होण्याची शक्यता होती. त्यास महाजे येथील सदस्य व काही ग्रामस्थांचा विरोध होता. येथे वाद होण्याची कुणकुण पोलीस प्रशासनाला लागल्याने वाढीव पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सादराळे व शृंगारपाडा येथील सदस्य निवडणूक प्रक्रियेस आले असता त्यांना अडवत प्रक्रियेसाठी जाण्यापासून रोखण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात जमल्या होत्या. त्यांनी सदर सदस्यांना अडविण्याचा प्रयत्न केला काही ग्रामस्थांनी दगडफेक केली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयात हलविले, मात्र, या गोंधळात काही महिलांनी सरपंचपदाच्या उमेदवार रुपाली भोये यांना रोखत त्यांच्यावर हल्ला केला. तसेच साडीने गळा आवळण्याचा प्रकार झाला. एका वृद्ध महिलेलाही मारहाण झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, हवालदार पजई, युवराज खांडवी आदी पोलिसांनी धाव घेत सदर महिलेची सुखरूप सुटका केली.यावेळी चव्हाण, खांडवी, पजई यांच्यासह पाच पोलीस जखमी झाले. पोलिसांनी जमावाला आटोक्यात आणत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बोलावत निवडणूक प्रक्रिया विहीत वेळेत पार पडली. या प्रकारानंतर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून गावात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :sarpanchसरपंचElectionनिवडणूक