शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गोदातीरावरील कपालेश्वर मंदिराचा दगड कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 01:52 IST

पावसाची संततधार सुरूच असून जूने आणि वास्तु पडत आहेत. शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगा घाटावरील श्री कपालेश्वर महादेव मंदिराच्या मागील बाजूचा घुमटाकार जवळ असलेला दगड २० ते २५ फुटावरून खाली कोसळण्याची घटना शुक्रवारी (दि.२) दुपारी घडली

ठळक मुद्देपावसामुळे घटना : सुदैवाने जीवितहानी टळली

पंचवटी : श्हरात पावसाची संततधार सुरूच असून जूने आणि वास्तु पडत आहेत. शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगा घाटावरील श्री कपालेश्वर महादेव मंदिराच्या मागील बाजूचा घुमटाकार जवळ असलेला दगड २० ते २५ फुटावरून खाली कोसळण्याची घटना शुक्रवारी (दि.२) दुपारी घडली सुदैवाने दगड मंदिराच्या मागील बाजूस कोसळला त्यावेळी कोणीही भाविक नसल्याने मोठी दुर्घटना टळली.याबाबत समजलेली माहिती अशी की गंगाघाटावर पुरातन महादेव कपालेश्वर मंदिर असून, पूर्णत: दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराच्या पाठीमागील भागाकडे घुमटाकार कळसाचा मोठा चौकोनी दगड दुपारी अचानक बांधकामातून कोसळला. गेल्या काही दिवसांपासून नाशकात पाऊस सुरू असून, त्यामुळे सर्वत्र ओल आलेली आहे. मंदिर पुरातन असल्याने त्याची डागडुजीही केली गेलेली नाही. त्यामुळे पावसामुळे मंदिराची भिंत भिजून सदर दगड कोसळला असावा अशी शक्यता परिसरात राहणाऱ्या ब्रह्मवृंदांनी वर्तविली आहे. ज्यावेळी मंदिराचा दगड कोसळला त्यावेळी पावसाची रिपरिप सुरू असल्याने कोणीही भाविक मंदिर परिसरात मागील बाजूस उभे नसल्याने मोठी दुर्घटना टळली.सुमारे २० ते २५ फुटावरून दगड खाली कोसळल्यानंतर मोठा आवाज झाल्याने मंदिरात दर्शनासाठी आलेल्या काही भाविकांनी लागलीच मंदिराबाहेर धाव घेतली तर परिसरात राहणाºया काही नागरिकांनी घटनास्थळी जाऊन दगड पडला त्या ठिकाणी लोखंडी बॅरिकेट्स टाकून नागरिकांना मंदिराला प्रदक्षिणा मारताना लांबून जावे अशा सूचना करत होते.पाऊस सुरू असताना मंदिरात भाविकांची गर्दी कमी होती. घुमटाकार जवळून दगड कोसळला त्यावेळी मंदिराच्या मागील बाजूस कोणीही भाविक नसल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र ऐन श्रावणात महादेवाचे स्थान असलेल्या कपालेश्वर मंदिराच्या कळसाचा दगड पडण्याच्या घटनेबद्दल उलट सुलट चर्चा होऊ लागली आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण