शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबक नाक्यावर बसने घेतला पेट; चालक-वाहकाचे प्रसंगावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 19:18 IST

नाशिकरोडवरुन प्रवाशी घेऊन उत्तमनगरकडे जात असलेली बस त्र्यंबकनाक्यावर आली असता अचानकपणे दुपारी चार वाजेच्या सुमारास चालकाशेजारी असलेल्या इंजिनच्या आतून धूर येऊ लागला.

ठळक मुद्देबसमधील अग्निप्ररोधक यंत्राच्या सहाय्याने पावडरचा माराबसमध्ये सुमारे दहा ते पंधरा प्रवाशी होते.

नाशिक : शहर बस वाहतूक करणाऱ्या बसेसपैकी पंचवटी आगाराची बस (एम.एच.१५ अ‍ेके ८०८३) नाशिकरोडवरून त्र्यंबकनाक्यामार्गे उत्तमनगरकडे जात असताना अचानकपणे चालकाच्या कॅबीनमधून धूर येऊ लागला. चालकाने प्रसंगावधान राखून बस तत्काळ वाहनांच्या गराड्यातून बाजूला उभी के ली. वाहकाने अग्निशामक दलाशी संपर्क साधत माहिती दिल्याने अनर्थ टळला.याबाबत अधिक माहिती अशी, नाशिकरोडवरुन प्रवाशी घेऊन उत्तमनगरकडे जात असलेली बस त्र्यंबकनाक्यावर आली असता अचानकपणे दुपारी चार वाजेच्या सुमारास चालकाशेजारी असलेल्या इंजिनच्या आतून धूर येऊ लागला. ही बाब चालक वाहकाच्या तत्काळ लक्षात आली. चालक संतोष घोडके याने बस सुरक्षितरित्या रस्त्याच्याकडेला उभी करत बसमधील अग्निप्ररोधक यंत्राच्या सहाय्याने पावडरचा मारा करत आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आगीने रौद्रावतार धारण करु नये, म्हणून महिला वाहक ज्योती अरिंगळे यांनी भ्रमणध्वनीवरुन अग्निशामक दलाशी संपर्क साधला. शिंगाडा तलाव येथून लिडिंग फायरमन इकबाल शेख, किशोर पाटील, विजय शिंदे, अनील गांगूर्डे, राजू पाटील, देविदास इंगळे हे जवान बंबासह अवघ्या दोन ते तीन मिनिटांत घटनास्थळी पोहचले. पाण्याचा मारा करुन आग विझविण्यात जवनांना यश आले. पावडरच्या सहाय्याने आग विझविण्याच्या प्रयत्नामुळे आगीने रौद्रावतार धारण केला नाही. जेव्हा बसने पेट घेतला तेव्हा बसमध्ये सुमारे दहा ते पंधरा प्रवाशी होते. चालक, वाहकांनी दाखविलेले प्रसंगावधान व अग्निशामक दलाच्या जवानांनी दाखविलेल्या प्रयत्नामुळे अनर्थ टळला.बसमधून धूर येऊ लागल्याचे लक्षात येताच परिसरातील व्यावसायिकांनीही मदतीसाठी बसच्या दिशेने धाव घेतली होती. या घटनेत बसचे जास्त नुकसान झाले नाही.

 

टॅग्स :Bus DriverबसचालकNashikनाशिकfireआग