शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

मोटारसायकलस्वारास लुटणाऱ्या चोरट्यांना अटक

By admin | Updated: January 17, 2017 01:48 IST

मोटारसायकलस्वारास लुटणाऱ्या चोरट्यांना अटक

इगतपुरी : मोटारसायकलस्वाराकडे पैसे आहेत म्हणून त्याचा घोटीपासून पाठलाग करत त्यास मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या पिंप्रीसदो फाट्याजवळ अडवून रोडच्या कडेला शेतात नेऊन तोंड दाबून त्याच्या खिशातील १६ हजार रुपये जबरदस्तीने काढून पोबारा करणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून इगतपुरी पोलिसांच्या स्वाधीन केले. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही जबरी चोरी मुंबई-आग्रा महामार्गावर गेल्या दीड महिन्यापूर्वी घडली होती.दि. २ डिसेंबर रोजी भानुदास शंकर मते (रा. तळेगाव रोड, इगतपुरी) यांना घोटीत एका व्यापाऱ्याने १६ हजार रुपये दिले. हे पैसे घेत असताना सदर आरोपींनी पाहिले होते. मते हे घोटीहून रात्री ९ वाजेच्या सुमारास मोटारसायकलवर घरी येत असताना त्यांचा तीन अज्ञात चोरट्यांनी पाठलाग करत त्यांना मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या पिंप्रीफाट्याजवळ अडवून रोडच्या कडेला शेतात नेऊन तोंड दाबून त्यांच्या खिशातील १६ हजार रुपये जबरदस्तीने काढून पोबारा केला होता. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना जबरी चोरीच्या गुन्ह्यात लुटणारा विलास ऊर्फअल्ट्या राजू तोकडे (रा. देवळा, ता. इगतपुरी) हा असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक भरत चौधरी, पोलीस हवालदार नवनाथ गुरुळे, रवि शिलावट, शिवाजी जुंदरे, बंडू ठाकरे, संदीप हांडगे, संदीप  लगड, मगेंश गोसावी यांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करता त्याने गुन्ह्याची कबुली  दिली.  गुन्हा करतेवेळी त्यांनी वापरलेली पल्सर मोटारसायकल (क्र. एमएच १५ डीङब्ल्यू ७३८३) वापरल्याचे सांगितले. त्याच्या सोबत आणखी दोन साथीदार धनराज संजय तुपे व लक्ष्मण कोंडाजी तोकडे (रा. देवळा, ता. इगतपुरी) असल्याचे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील पल्सर मोटारसायकल व रोख  एक हजार वीस रु पये जप्त करण्यात आले. (वार्ताहर)