आडगाव येथील चोरीस गेलेली मूर्ती सापडली पंचवटी : आडगाव येथील ग्रामदेवता महालक्ष्मी मंदिरातून शनिवारी रात्री चोरीला गेलेली महालक्ष्मी देवीची मूर्ती सिन्नर तालुक्यातल्या खोपडी खुर्द शिवारातील शेतात बेवारस स्थितीत आढळून आली आहे. चोरट्यांनी मूर्ती पोत्यात घालून याठिकाणी शेतातील झुडपात टाकून दिली असावी असा पोलिसांचा संशय आहे. आडगाव येथील महालक्ष्मी चौकामध्ये असलेल्या महालक्ष्मी देवी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी देवीची पितळाची मूर्ती चोरून नेल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली होती. मूर्ती चोरीला गेल्याची बातमी पसरल्यानंतर मंदिराच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. आडगाव ग्रामस्थांनी या चोरीचा तीव्र संताप व्यक्त केला होता. सोमवारी सायंकाळी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, हवालदार एस. व्ही. शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.
आडगाव येथील चोरीस गेलेली मूर्ती सापडली
By admin | Updated: November 24, 2015 23:37 IST