शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

मानव-बिबट्या संघर्षाविरुद्ध ‘जाणता वाघोबा’वनविभागाचे पाऊल : संगमनेर-जुन्नरच्या धर्तीवर निफाडमध्ये जनजागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:26 IST

नाशिक : बिबट्याच्या हल्ल्याच्या वाढत्या घटनांमुळे निफाड तालुक्यातील गोदाकाठावर मानव-बिबट्या संघर्ष सुरू झाला आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाने जनजागृतीच्या दिशेने पुढील पाऊल टाकले आहे. बिबट्याच्या सवयींविषयीची माहिती आणि उपाययोजनांबाबत शेतकºयांना जागरूक करण्यासाठी वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटीच्या माध्यमातून ‘जाणता वाघोबा’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. 

ठळक मुद्देनाशिक : बिबट्याच्या हल्ल्याच्या वाढत्या घटनांवनविभागाने जनजागृतीच्या दिशेने पुढील पाऊल

नाशिक : बिबट्याच्या हल्ल्याच्या वाढत्या घटनांमुळे निफाड तालुक्यातील गोदाकाठावर मानव-बिबट्या संघर्ष सुरू झाला आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाने जनजागृतीच्या दिशेने पुढील पाऊल टाकले आहे. बिबट्याच्या सवयींविषयीची माहिती आणि उपाययोजनांबाबत शेतकºयांना जागरूक करण्यासाठी वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटीच्या माध्यमातून ‘जाणता वाघोबा’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. गोदावरीच्या खोºयात वसलेल्या नाशिकमधील निफाड तालुका ऊस उत्पादनासाठी सर्वत्र ओळखला जातो. येथील शेतकºयांचे मुख्य पीक ऊस असून, शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हादेखील व्यवसाय बहुतांश शेतकरी या तालुक्यात करतात. ऊसशेतीमुळे निर्माण झालेला सुरक्षित अधिवास, प्रजननासाठी योग्य ठिकाण आणि मुबलक खाद्य यामुळे निफाड तालुक्यातील गोदाकाठावर मागील काही वर्षांपासून बिबट्यांचे वास्तव्य वाढल्याचे निरीक्षण नाशिक पूर्व वनविभागाने नोंदविले आहे. बिबट्यांना जेरबंद करण्याबरोबरच नागरिकांमध्येही बिबट्याची शास्त्रीय माहिती पोहचावी जेणेकरून बिबट्याविषयी मनात असलेला राग कमी होण्यास मदत होईल आणि बिबट्याच्या हल्ल्यांपासून खबरदारी घेण्याच्या उपाययोजनांबाबतही जागरूकता निर्माण होईल या उद्देशाने ‘जाणता वाघोबा’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत निफाडच्या गावागावांमध्ये प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळांसह शेतांच्या बांधांवर जाऊन बिबट्याचे जीवशास्त्र, त्याच्या सवयी, हल्ल्याची कारणे, शास्त्रीय संशोधन, मानवी सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देऊन जागृती करण्याचा प्रयत्न असल्याचे वनविभागाचे उपवनसंरक्षक आर. एम. रामानुजम यांनी सांगितले. सदर जनजागृतीपर अभियानाला प्रारंभ करण्यात आला असून, सातत्याने संपूर्ण गोदाकाठालगतच्या गावागावांमध्ये याअंतर्गत कार्यक्र म राबविले जाणार असून, नागरिकांमध्ये बिबट्या या वन्यजिवाविषयीची जागृती निर्माण करण्याबरोबरच संरक्षणाचे धडेही देण्याचा प्रयत्न स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींकडून वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे सहायक वनसंरक्षक राजेंद्र कापसे यांनी सांगितले.इन्फो—संगमनेर-जुन्नरच्या धर्तीवर प्रयोगवाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटीच्या माध्यमातून संगमनेर व जुन्नर या तालुक्यांमध्ये यापूर्वी वनविभागाच्या स्थानिक कार्यालयांच्या मार्गदर्शनाखाली ‘जाणता वाघोबा’ हे अभियान राबविण्यात आले. या तालुक्यांमधील गावांमध्ये सदर अभियानाचे सकारात्मक परिणाम दिसल्याचा वनविभागाचा व सोसायटीची दावा आहे. सोसायटीच्या वन्यजीव शास्त्रज्ञ डॉ. विद्या अत्रेया व अभियानाच्या समन्वयक मृणाल घोसाळकर यांच्यावर अभियानाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.—या गावांवर लक्षनिफाड, कोठुरे, कुरुडगाव, जळगाव-निपाणी, काथरगाव, सुंदरपूर, म्हाळसाकोरे, तारुखेडले-तामसवाडी, नांदूरमधमेश्वर, भुसे, करंजगाव, शिवरे, दिंडोरीतास, तळवाडे, मांजगाव, चापडगाव, शिंगवे, गोदानगर या गावांवर पहिल्या टप्प्यात लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे घोसाळकर यांनी सांगितले.