पेठ : गत नऊ ते दहा महिन्यांपासून कोरोना व लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने पेठ शहरातील स्टेशनरी व्यावसायिक अडचणीत आले असून, लाखो रुपयाचा खरेदी केलेला माल गोडाऊनमध्ये धूळ खात पडला आहे. दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी स्टेशनरी व्यावसायिक वह्या, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करून ठेवतात. मात्र जून महिन्यात शाळाच सुरू न झाल्याने खरेदी केलेला माल विक्री न झाल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. गत वर्षभरापासून गोडाऊनमध्ये पडलेला माल धूळ खात असल्याने अनेक स्टेशनरी व्यावसायिक अडचणीत सापडले असून, ज्या व्यापाऱ्यांकडून माल खरेदी केला आहे. तिकडूनही वसुलीचा तगादा लावला जात असल्याने सामान्य व्यावसायिक मात्र दुहेरी कात्रीत सापडला आहे. (०२ पेठ १)
-------------------
दरवर्षी जून महिन्यात शाळा उघडण्यापूर्वी एप्रिल व मे महिन्यात पालकांची वह्या-पुस्तके खरेदी करण्याची लगबग असते. त्यामुळे जानेवारीतच ग्रामीण भागातील व्यावसायिक माल खरेदी करून ठेवतात. यावर्षीही नियमित माल खरेदी केल्यानंतर मार्चपासून लॉकडाऊन झाल्यामुळे तसेच शाळा बंद असल्याने स्टेशनरी व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
- अमोल पेठकर, स्टेशनरी व्यावसायिक, पेठ
===Photopath===
021220\02nsk_19_02122020_13.jpg
===Caption===
(०२ पेठ १)