शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस प्रशासनाच्या विरोधात  ६ ला सीटूचे राज्यव्यापी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:07 IST

भांडवलदारांच्या सांगण्यावरून पोलिसांनी सीटू युनियनचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असून, हा गुन्हा पोलिसांनी मागे न घेतल्यास दि. ६ जून रोजी संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सीटूचे सरचिटणीस एम. एच. शेख यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

सातपूर: भांडवलदारांच्या सांगण्यावरून पोलिसांनी सीटू युनियनचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असून, हा गुन्हा पोलिसांनी मागे न घेतल्यास दि. ६ जून रोजी संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सीटूचे सरचिटणीस एम. एच. शेख यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. पोलिसांनी यापूर्वीदेखील २/३ वेळा डॉ. कराड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला आहे. आताही कामगारांच्या तथाकथित मारहाणीत डॉ. कराड यांचा काहीही संबंध नसताना पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे. भांडवलदारांच्या दबावाला पोलीस प्रशासन बळी पडत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणचा मंडप उखडून पोलीस प्रशासनाने लोकशाहीविरोधात कृत्य केले होते. न्यायालयीन लढ्यानंतर पुन्हा आंदोलन सुरू झाल्याने पोलीस प्रशासनाला चपराक बसली. या प्रकरणाचा सूड उगवण्यासाठी पोलीस प्रशासनाने डॉ. कराड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. डॉ. कराड निर्दोष असल्याचा दावाही शेख यांनी केला आहे.  यावेळी मुंबई श्रमिक संघाचे डॉ. विवेक मॉन्टेरो, सीटूचे उपाध्यक्ष सईद अहमद, उद्धव भवलकर, सचिव  भरमा कांबळे, खजिनदार के. आर.  रघू, सीताराम ठोंबरे, आर. एस.  पांडे, कल्पना शिंदे आदी उपस्थित होते.दडपशाहीविरोधात संपूर्ण देशात चळवळपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांची भेट घेऊन गुन्हा मागे घेण्याची विनंती केली आहे. गुन्हा मागे न घेतल्यास दि. ६ जून रोजी राज्यात आंदोलन छेडण्यात येणार आहे. नाशिकला संप पुकारण्यात येईल. तरीही गुन्हा मागे घेतला नाहीतर पोलिसांच्या दडपशाहीविरोधात संपूर्ण देशात एक मोठी चळवळ उभारण्यात येणार आहे. यात अन्य कामगार संघटनांनादेखील सहभागी करून घेण्यात येणार आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय