लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : गेल्या दोन आठवड्यांपासून सातपूर औद्योगिक वसाहतीत होत असलेल्या खंडित वीजपुरवठ्यामुळे उद्योजक त्रस्त झाले असून, अखंडित पुरवठा करण्याची मागणी निमाच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून दररोज दोन ते तीन तास वीज खंडित होत असल्याकारणाने सी-११ मधील उद्योजक त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठा खंडीत होत असल्याने उद्योजकांचे आर्थिक नुकसान होत असून, याबाबत निमातर्फे महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नंदनवार यांना सी-११ येथे बोलावून पाहणी करण्यात आली. त्यांनी तेथील उद्योजकांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी उद्योजकांनी ट्रान्सफार्मरची दुरुस्तीची मागणी करून अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी सतीश पगार,अंबादास चौरे, मिलिंद कुलकर्णी, मोहन शेरूगर, धनंजय राव, कैलास पाटील, नितीन तोडवल यांनी केली.निमातर्फे महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नंदनवार यांना सी-११ येथे बोलावून पाहणी करण्यात आली. त्यांनी तेथील उद्योजकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
अखंडित वीजपुरवठ्यासाठी निमाचे अधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:26 IST
सातपूर : गेल्या दोन आठवड्यांपासून सातपूर औद्योगिक वसाहतीत होत असलेल्या खंडित वीजपुरवठ्यामुळे उद्योजक त्रस्त झाले असून, अखंडित पुरवठा करण्याची मागणी निमाच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अखंडित वीजपुरवठ्यासाठी निमाचे अधिकाऱ्यांना निवेदन
ठळक मुद्दे सी-११ मधील उद्योजक त्रस्त झाले आहेत.