वैद्यकीय परीक्षा रद्द करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 02:55 PM2020-07-02T14:55:44+5:302020-07-02T14:56:25+5:30

चांदोरी : इतर विभागाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासन विचाराधीन असून आता वैद्यकीय विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी देखील आता परीक्षा रद्द करण्याची मागणी करू लागले आहे. या साठी अनेक विद्यार्थी संघटना पुढे सरसावल्या आहेत.

Statement to the Deputy Chief Minister for cancellation of medical examination | वैद्यकीय परीक्षा रद्द करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांना निवेदन

वैद्यकीय परीक्षा रद्द करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांना निवेदन

Next
ठळक मुद्दे वैद्यकीय विभागात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात,

चांदोरी : इतर विभागाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासन विचाराधीन असून आता वैद्यकीय विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी देखील आता परीक्षा रद्द करण्याची मागणी करू लागले आहे. या साठी अनेक विद्यार्थी संघटना पुढे सरसावल्या आहेत.
मंगळवारी विद्यार्थी चळवळ संघटनेचे अध्यक्ष प्रवीण राडे यांनी मुबई मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेऊन वैद्यकीय परीक्षा रद्द करण्यासाठी निवेदन दिले. शासनाने इतर विद्यार्थ्यांप्रमाणे वैद्यकीय विभागात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, तसेच गावापासून दूर राहणारे विद्यार्थी आता लॉकडाउनमुळे गावी गेले आहेत, त्यांच्या अभ्यासासाठी साहित्य व पुरेशी पुस्तके नाही, तसेच बाहेरगावी राहणाºया विद्यार्थ्यांना प्रवास करून परीक्षा केंद्रावर दाखल व्हावे लागणार आहे यात मोठा मानसिक त्रास विद्यार्थ्यांना होणार आहे. तसेच परीक्षेदरम्यान कोणत्याही विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेईल असे उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेनात म्हटले आहे.

Web Title: Statement to the Deputy Chief Minister for cancellation of medical examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.