शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रं सादर करून स्टेट बँकेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 00:21 IST

पिंपळगाव बसवंत : शेती कर्ज मिळविण्याच्या उद्देशाने बनावट व खोटे दस्तऐवज तयार करुन बँकेत सादर करुन १४ लाख ८७,००० रूपयांचे कर्ज मिळवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा अधिकारी यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात संबंधित शेतकऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कैलास रामचंद्र खोडे वय वर्षे ५२ राहणार जोपूळ रोड पिंपळगाव बसवंत असे फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

ठळक मुद्दे१४ लाख ८७ हजारांना गंडा : पिंपळगावच्या शेतकऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

पिंपळगाव बसवंत : शेती कर्ज मिळविण्याच्या उद्देशाने बनावट व खोटे दस्तऐवज तयार करुन बँकेत सादर करुन १४ लाख ८७,००० रूपयांचे कर्ज मिळवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा अधिकारी यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात संबंधित शेतकऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कैलास रामचंद्र खोडे वय वर्षे ५२ राहणार जोपूळ रोड पिंपळगाव बसवंत असे फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.फसवणूक करणारा संशयित रामचंद्र खोडे याने स्टेट बँक ऑफ इंडिया ०५५३९ शाखा पिंपळगाव ब. यांचेकडून शेती कर्ज मिळविण्याच्या हेतूने बनावट व खोटे दस्तऐवज तयार करुन ते खोटे आहे असे माहीत असताना देखील ते खरे आहे असे भासवून अप्रामाणिकपणे कर्ज प्रकरण बँकेत सादर करुन शेती कर्ज एकूण १४,८७,००० रूपयेमिळवून बँकेची फसवणूक केली. हे बँकेच्या लक्षात येताच बँकेचे शाखा अधिकारी दत्तात्रय किसन टाके यांनी संशयित आरोपी कैलास रामचंद्र खोडे यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयातून हे प्रकरण सीआरपीसी होऊन पिंपळगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. त्यानुसार पिंपळगाव पोलीस ठाण्यात रामचंद्र खोडे यांच्यावर बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहायक निरीक्षक कुणाल सपकाळे करत आहे.

टॅग्स :bankबँकCrime Newsगुन्हेगारी