शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांचा विरोध डावलून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास प्रारंभ

By संजय पाठक | Updated: November 25, 2023 11:33 IST

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने या संदर्भात चार आठवड्यापूर्वी आदेश दिले होते.

नाशिक-  मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठीनाशिक जिल्ह्यातील दारणा धरणामधून पाणी सोडण्यास आमदार- खासदार, राजकिय नेते आणि शेतकाऱ्यांचा विरोध जुगरून अखेरीस मध्यरात्री पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने या संदर्भात चार आठवड्यापूर्वी आदेश दिले होते.  त्यानंतर नाशिक आणि अहमदनगर येथून राजकीय विरोध सुरू झाला होता तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. मात्र महामंडळाच्या आदेशाला स्थगिती मिळाली नाही. नाशिक जिल्ह्यात यंदा जेमतेम 60 टक्के पाऊस झाला आहे त्यामुळे आता पासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. शेतीला योग्य वेळी पाणी मिळाले नाही तर शेती उद्ध्वस्त होईल अशी भीती आहे. त्यातच पाणी टंचाई असताना नाशिक आणि नगर मधून 9 टीएमसी पाणी सोडल्यास जायकवाडी पर्यँत 6 टीएमसी पाणी पोहोचणार असुन 9 टीएमसी लॉसेस आहेत त्यामुळे नाशिक आणि नगरमधून पाणी सोडण्यास विरोध होत होता.

दरम्यान काल रात्री जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दारणा धरण समूहातून पाणी सोडण्याचे आदेश दिले त्यानुसार मध्यरात्री 200 क्यूसेक वेगाने इतके पाणी सोडण्यात आले आहे गोदावरी पात्रावरील कालव्यांच्या फळ्या काढण्याचे काम सुरू झाल्यानंतर हळूहळू पुढील विसर्ग करण्यात येणार आहे. दारणा धरण समूहातून 2.643 टीएमसी आणि गंगापूर धरणातून .5 म्हणजे अर्धा टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश असून त्यापैकी तूर्तास केवळ दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकJayakwadi Damजायकवाडी धरण