शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
5
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
6
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
7
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
8
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
9
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
10
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
11
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
12
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
13
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
14
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
15
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
16
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
17
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
18
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
19
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
20
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 

फुटलेल्या जलवाहिनी दुरूस्तीच्या कामाला मनपाकडून सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 01:29 IST

मेनगेट येथील मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रात जाणाऱ्या जलवाहिनीला नवले कॉलनी रस्त्याच्या खाली गळती लागल्याने मुद्रणालयाच्या पडिक जागेत डबके साचून दूषित पाणीपुरवठा होत होता. यामुळे रहिवाशांना त्वचेच्या आजाराची लागण होत असल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच मनपा प्रशासनाकडून लागलीच नवले कॉलनी रस्ता फोडण्यास सुरुवात करून कामास सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्देप्रशासनाला आली जाग : नागरिकांमध्ये समाधान

नाशिकरोड : मेनगेट येथील मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रात जाणाऱ्या जलवाहिनीला नवले कॉलनी रस्त्याच्या खाली गळती लागल्याने मुद्रणालयाच्या पडिक जागेत डबके साचून दूषित पाणीपुरवठा होत होता. यामुळे रहिवाशांना त्वचेच्या आजाराची लागण होत असल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच मनपा प्रशासनाकडून लागलीच नवले कॉलनी रस्ता फोडण्यास सुरुवात करून कामास सुरुवात करण्यात आली.मेनगेट येथील मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रात जाणारी जलवाहिनी गेल्या आठ महिन्यांपासून नवले कॉलनी रस्त्याखाली गळती लागल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. जलवाहिनीतून वाया जाणारे पाणी रस्त्या शेजारील मुद्रणालयाच्या पडिक मोकळ्या जागेत डबक्या स्वरूपात साचले आहे. पडिक जागेवर साचलेले पाणी जमिनीत झिरपत नसल्यामुळे ते पाणी दूषित व दुर्गंधीयुक्त झाले आहे. यामुळे डासांची उत्पती वाढत आहे. डबक्यातील दूषित पाणी नवले कॉलनी व आजूबाजूच्या रहिवाशांच्या बोरिंग, विहिरीत उतरल्याने रहिवाशांना त्वचेचे आजाराची लागण आहेत. यामुळे काही रहिवासी घर सोडून दुसरीकडे राहण्यास निघून गेले आहे. याबाबतचे सविस्तर सचित्र वृत्त शुक्रवार (दि.७) ‘लोकमत’च्या अंकात प्रसिद्ध झाले. या वृत्ताची दखल घेऊन मनपा प्रशासनाने शुक्रवारी सकाळपासून नवले कॉलनी रस्त्यावरील जलवाहिनीचे लिकेज शोधून दुरुस्ती करण्यासाठी मजुराच्या मदतीने सीमेंट कॉँक्रीटचा रस्ता फोडण्यास सुरुवात केली. दुपारपासून ‘ब्रेकर’ मशीनच्या साह्याने सीमेंट कॉँक्रीटचा रस्ता फोडण्यात येत होता. मात्र मनपाने हाती घेतलेले काम चार-पाच मजुरांच्या मदतीने अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याने अजून जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी किती दिवस लागतील हे मनपा प्रशासनालाच माहीत नाही. परंतु ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका