शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा काळाबाजार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:40 IST

येथील महापालिकेच्या पवननगर जलकुंभातून गेल्या अनेक महिन्यांपासून एका प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाकडून बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा काळाबाजार केला जात असल्याची बाब शिवसेना नगरसेवकांनी उघडकीस आणली .

सिडको : येथील महापालिकेच्या पवननगर जलकुंभातून गेल्या अनेक महिन्यांपासून एका प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाकडून बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा काळाबाजार केला जात असल्याची बाब शिवसेना नगरसेवकांनी उघडकीस आणली असून, यात मनपाचे अधिकारी व कर्मचारीदेखील सामील असल्याचे बोलले जात आहे.  जलकुंभातून किती पाणी टॅँकरमधून काढण्यात आले याबाबतचा कोणताही तपशील मनपाकडे नसून असाच प्रकार शहरातील इतर जलकुंभातूनही होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एकीकडे नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नसताना दुसरीकडे मनपा कर्मचाऱ्यांच्या संगनमताने दररोज हजारो लिटर पाण्याची चोरी होत असल्याने याकडे मनपा आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.पवनगर भागात असलेल्या मनपाच्या जलकुंभातून एका प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाकडून महिनाभरातून ५० टॅँकरची रीतसर पावती घेत त्याची आगाऊ रक्कम भरून दररोज दिवसाढवळ्या हजारो लिटर पाणी चोरी करण्याचा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून होत असल्याची बाब शिवसेना नगरेसवक किरण गामणे यांनी उघडकीस आणली आहे. याबाबतचा जाब मनपा अधिकाºयांना विचारल्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिक यांचे राजकीय लागेबांधे असल्याने त्यांना डिवचण्याचा प्रयत्न कोणी करीत नसल्याचे समजते. विशेष म्हणजे संबंधित बांधकाम व्यावसायिक पिण्याचे पाणी बांधकामासाठी कसे वापरतो? व मनपा अधिकारी, कर्मचारीदेखील याबाबत मौन बाळगत असल्याने याबाबात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगरसेवक गामणे यांनी सिडकोतील प्रकार उघडकीस आणला असला तरी असाच प्रकार शहरातील इतर जलकुभांतूनही होत असल्याचा संशय यातून व्यक्त केला जात आहे. पाणीपुरवठा अधिकाºयांंकडे याबाबतची संपूर्ण माहिती असणे गरजेचे असताना याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याने यातून दररोज हजारो लिटर पाणी चोरी होत असल्याचे दिसून येत आहे.सिडको येथे मोठ्या प्रमाणात कामगार वस्ती आहे. येथील रहिवाशांना अनेकदा पिण्यापुरतेही पाणी मिळत नसताना दुसरीकडे मात्र दररोज हजारो लिटर पाण्याचा काळाबाजार होत असल्याने याबाबत मनपा आयुक्तांनी दखल घेण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.गामणे यांनी महासभेत उपस्थित केला प्रश्नसिडकोतील पवननगर जलकुंभातून बांधकामासाठी बांधकाम व्यावसायिकाकडून पाणीचोरी केली जात असल्याबाबत महासभेत लक्षवेधी सूचना मांडली. सिडकोत काही नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नसताना दुसरीकडे पाणीचोरी करणाºया बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करावी, अशी मागणीही आयुक्तांकडे गामणे यांनी केली आहे. याबाबत आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater transportजलवाहतूक