शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

खोपडी-मीरगाव पूरकालव्याचे काम सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 01:12 IST

तत्कालीन आघाडी शासनाच्या काळात सुमारे सात वर्षांपूर्वी मंजुरी मिळूनही काम सुरू होऊ न शकलेल्या खोपडी-मरिगाव पूरकालव्याचे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंधारणमंत्री शंकर गडाख व जलसंधारण अधिकाऱ्यांना दिले. त्यासाठी वित्त विभागामार्फत ७२ कोटींहून अधिक निधी देण्यासही मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्दे अजित पवार यांचे आदेश : मंत्रालयात बैठक, ७२ कोटींचा निधी मंजूर; नागरिकांमध्ये समाधान

सिन्नर : तत्कालीन आघाडी शासनाच्या काळात सुमारे सात वर्षांपूर्वी मंजुरी मिळूनही काम सुरू होऊ न शकलेल्या खोपडी-मरिगाव पूरकालव्याचे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंधारणमंत्री शंकर गडाख व जलसंधारण अधिकाऱ्यांना दिले. त्यासाठी वित्त विभागामार्फत ७२ कोटींहून अधिक निधी देण्यासही मंजुरी देण्यात आली.आमदार माणिकराव कोकाटे यांनी आघाडी शासनाच्या काळात सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील अवर्षणग्रस्त भागाला हरित संजीवनी देण्याच्या उद्देशाने कुंदेवाडी ते सायाळे व खोपडी ते मीरगाव या दोन पूरकालव्यांना प्रशासकीय मंजुरी मिळवली होती. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजनही झाले होते. जलसंधारणमंत्री गडाख, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, वित्त विभागाचे सचिव राजू मित्तल, जलसंधारण विभागाचे सचिव नंदकुमार, औरंगाबाद जलसंधारण महामंडळाचे मुख्य अभियंता विश्वनाथन यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सुमारे ३६ कोटींची ही योजना सुमारे ७२ कोटींहून अधिक रुपयांना जाईल, असे जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगताच पवार यांनी त्यास तत्काळ सुधारित आर्थिक मंजुरी दिली. यावेळी हिवरे व चोंढी येथील कोटा बंधाºयांचे कार्यारंभ आदेशही देण्याचे आश्वासन दिले.टाकेद गटातील उपसा सिंचन योजना सुरू होणारदहा वर्षांपासून टाकेद गटात आदिवासी भागात मंजुरी मिळालेल्या उपसा सिंचन योजना सुरू होऊ शकलेल्या नाही. या भागाची आदिवासी लोकसंख्या ९० टक्के नसल्याने अडथळे येत असल्याचा मुद्दा आमदार कोकाटे यांनी मांडून बाळ भैरवनाथसारख्या उपसा सिंचन योजना एनजीओमार्फत चालविण्यास परवानगी देण्याची मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी विशेष बाब म्हणून आदिवासी लोकसंख्येची अट शिथिल करत ना नफा ना तोटा तत्त्वावर टाकेद गटातील उपसा सिंचन योजना एनजीओमार्फत चालविण्यास परवानगी दिली. त्यामुळे टाकेद गटातील उपसा जलसिंचन योजनाही लवकरच सुरू होणार आहेत. शिवाय हा भाग आदिवासी असल्याने केंद्र सरकारकडून आदिवासी भागासाठी मिळणाºया निधीअंतर्गतही जास्तीतजास्त कामे या भागात मंजूर होतील, याकडे लक्ष देण्याच्या सूचना पवार यांनी अधिकाºयांना दिल्या.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारFarmerशेतकरी