टेबल टेनिस स्पर्धांना प्रारंभ

By Admin | Updated: December 14, 2014 02:02 IST2014-12-14T02:01:21+5:302014-12-14T02:02:04+5:30

टेबल टेनिस स्पर्धांना प्रारंभ

Start of Table Tennis Tournament | टेबल टेनिस स्पर्धांना प्रारंभ

टेबल टेनिस स्पर्धांना प्रारंभ

  नाशिक - शिवसत्य क्रीडा मंडळ व टेबल टेनिस प्रशिक्षक शशांक वझे यांच्या वतीने आयोजित बाबा बोकील स्मृती टेबल टेनीस स्पर्धेस आजपासून प्रारंभ झाला़ शिवसत्य क्रीडा मंडळाच्या टेबल टेनिस हॉलमध्ये जिमखान्याचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले़ तसेच यावेळी राज्याच्या संघात निवड झालेल्या पुनित देसाई याचा सत्कार छाजेड व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला़ याप्रसंगी संघटनेचे सचिव संजय मोडक, शेखर भंडारी, अविनाश खैरनार, संजय मालुसरे आदि उपस्थित होते़ स्पर्धेत ११५ खेळाडूंनी टेबल टेनीस खेळाडूंनी सहभाग घेता आहे़ या स्पर्धा १५ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत़ स्पर्धेचे हे सातवे वर्षे आहे़

Web Title: Start of Table Tennis Tournament