शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कांदा लागवडीऐवजी पेरणीचा फंडा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 01:15 IST

नायगाव : सतत बदलणाऱ्या हवामानामुळे कांदा रोपांची व लागवड केलेल्या कांद्याचे नुकसान होत आहे. लागवडीचा खर्च परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी लागवडीऐवजी पेरणीचा फंडा सुरू केला आहे. सिन्नरच्या उत्तर व पश्चिम पट्ट्यात शेकडो हेक्टर क्षेत्रावर कांद्याची पेरणी करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.

ठळक मुद्देसिन्नर तालुका : बदलत्या हवामानाने नुकसान

नायगाव : सतत बदलणाऱ्या हवामानामुळे कांदा रोपांची व लागवड केलेल्या कांद्याचे नुकसान होत आहे. लागवडीचा खर्च परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी लागवडीऐवजी पेरणीचा फंडा सुरू केला आहे. सिन्नरच्या उत्तर व पश्चिम पट्ट्यात शेकडो हेक्टर क्षेत्रावर कांद्याची पेरणी करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.जिल्ह्यात कांद्याचे आगार म्हणून नायगाव खोऱ्याची ओळख आहे. यंदा मात्र खोऱ्यातील कांदा पीक सतत पडणारा पाऊस व बदलणाऱ्या हवामानामुळे पुरता खराब झाला आहे. महागडे कांदा बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी टाकलेली रोपे पूर्णता वाया गेली. शेतातील आर्द्रता व खराब हवामान यामुळे रोपांची उगवणच झाली नाही. लागवड केलेले कांदा पीक पाऊस व हवामानामुळे शेतातच सडले. वारंवार रोपे व कांदा लागवड करूनही खरिपापाठोपाठ रब्बीचा हंगाम वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.कांदा पीक मशागत, लागवड, खते व औषध आदी खर्च करूनही वाया गेल्यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याची यंत्राद्वारे पेरणी करण्याची शक्कल लढवली आहे. कमी खर्चात कांद्याचे क्षेत्र तयार होत असल्यामुळे प्रत्येक गावात या पेरणीयंत्राला मागणी वाढली आहे. बघता बघता संपूर्ण नायगाव खोऱ्यात कांद्याची लागवड करण्याऐवजी पेरणीला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. नायगाव खोऱ्याबरोबरच पश्चिम पट्ट्यातील चिंचोली, मोह, वडगाव पिंगळा आदी गावांमध्येही पेरणी करण्यावर शेतकरी भर देताना दिसत आहे. आत्तापर्यंत शेकडो हेक्टर क्षेत्रावर कांद्याची पेरणी पूर्ण पूर्ण झाली आहे.यावर्षी पाऊस व दूषित हवामानामुळे लागवड केलेल्या कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करून पीक वाया गेल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. पेरणीयंत्राच्या साह्याने कांदा पेरणी केल्यास शेतकऱ्यांचा वावरबांधणी, कांदा लागवड, रोपांची निगा आदींसह इतर खर्चाची बचत होत आहे. त्यामुळे कांदा पिकाच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.- अजय हुळहुळे, शेतकरी, वडगाव पिंगळा 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी