शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठ भागात ऊसतोडणीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 00:42 IST

चांदोरी : निफाड तालुक्यातील संपूर्ण गोदाकाठ परिसरात ऊसतोडणीस प्रारंभ झाला असून, हजारो ऊसतोड कामगार दाखल झाले आहेत. दरम्यान, निफाड व रानवड सहकारी साखर कारखाने बंद पडल्याने ऊस उत्पादकांना कादवा, पिंपळगाव निपाणी येथील गोदा कादवा, तसेच अहमदनगर जिल्ह्यातील संजीवनी, अगस्ती व कोळपेवाडी येथील कारखान्यांना ऊस द्यावा लागतो. यंदाही जिल्ह्यातील उसासाठी नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी प्रयत्न चालविले आहेत.

ठळक मुद्देऊस मिळविण्यासाठी नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कचांदोरी : निफाड तालुक्यातील संपूर्ण गोदाकाठ परिसरात ऊसतोडणीस प्रारंभ झाला असून, हजारो ऊसतोड कामगार दाखल झाले आहेत.दरम्यान, निफाड व रानवड सहकारी साखर कारखाने बंद पडल्याने ऊस उत्पादकांना कादवा, पिंपळगाव निपाणी येथील गोदा कादवा, तसेच अहमदनगर जिल्ह्यातील संजीवनी, अगस्ती व कोळपेवाडी येथील कारखान्यांना ऊस द्यावा लागतो. यंदाही जिल्ह्यातील उसासाठी नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी प्रयत्न चालविले आहेत.निफाड तालुक्यातील चांदोरी येथे अनेक उसाचे खासगी व्यापारी असून, त्यांच्यामार्फत गुजरात, दिल्ली, राजस्थान येथे रसवंतीकरिता तसेच चांदोरी व पिंपळस येथील गूळ उद्योगास ऊस पाठविला जातो. त्यामुळे तालुक्यातील गोदाकाठ भागात उसाची व्यापारीपेठ निर्माण झाली आहे.यंदाच्या गळीत हंगामासाठी गोदाकाठ भागात ऊसतोडणीस प्रारंभ झाला आहे. तसेच जिल्ह्यात व नगर जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस पोहोचविण्यासाठी चाळीसगाव, बीड, औरंगाबाद येथील ऊसतोडणी मजूर चांदोरी परिसरात दाखल झाले आहेत. साधारणत: सर्वच कारखान्याचे बॉयलर पेटले असून, दसरा झाल्यानंतर साखर कारखाने सुरू केले जातात. त्यानंतर अनेक महिने कारखान्यांचे गाळप सुरू असते. बहुतांश शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहाराचे गणित हे द्राक्ष व उसाच्या पिकांवर अवलंबून असते. त्यामुळे उसाला जास्त दर मिळण्याची अपेक्षा शेतकरीवर्ग करीत आहे. प्रामुख्याने, जादा दर देणाºया कारखान्यांना किंवा व्यापाऱ्यांना ऊस देण्याकडे शेतकºयांचा कल आहे, तर बाहेरील कारखान्यांनी गोदाकाठ परिसरातील ऊस सर्वात लवकर उचलण्याची घाई चालविली आहे. प्रामुखयाने नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गोदाकाठ भागातील ऊस मिळविण्यासाठी जादा दर देवून प्रयत्न चालविले आहे. खासगी कारखान्यांचे आव्हानउसाला हमीभाव मिळत असल्याने बव्हंशी शेतकरी ऊस लागवडीला प्राधान्य देतात. पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत असल्याने त्याचा लागवडीवर परिणाम होत आहे. ऊस नैसर्गिक आपत्तीला बळी पडत नाही, असा समज आहे. गारपीट किंवा तत्सम काही घटना घडली तरी उसाचे फार नुकसान होत नाही, असे शेतकºयांना वाटते. साखर कारखानदारीत दर देण्याची स्पर्धा वाढली आहे. त्यात खासगी कारखान्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेNashikनाशिक