शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा बाजार समितीत रोख चुकवतीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 20:11 IST

सटाणा : येथील बाजार समितीत शेतमाल विक्र ी करणाऱ्या शेतकºयांना रोख पेमेंट देण्याची सर्व व्यापाºयांना सक्ती करण्यात आली असून, सोमवारपासून (दि.६) या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरु वात झाल्याची माहिती सभापती मंगला सोनवणे यांनी दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित सभापती मंगला प्रवीण सोनवणे यांच्यासह सर्व संचालकांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत ...

सटाणा : येथील बाजार समितीत शेतमाल विक्र ी करणाऱ्या शेतकºयांना रोख पेमेंट देण्याची सर्व व्यापाºयांना सक्ती करण्यात आली असून, सोमवारपासून (दि.६) या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरु वात झाल्याची माहिती सभापती मंगला सोनवणे यांनी दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित सभापती मंगला प्रवीण सोनवणे यांच्यासह सर्व संचालकांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.कसमादे परिसरातील सर्वच बाजार समित्यांमध्ये शेतकºयांना रोखीने पेमेंट करणे बंधनकारक असताना व्यापाºयांकडून मात्र याची अंमलबजावणी केली जात नव्हती. शेतमाल विक्र ी केलेल्या मालाच्या मोबदल्यात बहुतांशी शेतकºयांना जमा पावती किंवा एक महिन्याच्या तारखेचा धनादेश दिला जात होता. अनेकवेळा व्यापाºयांनी दिलेले धनादेश बाउन्स होण्याच्या तक्र ारी बाजार समितीकडे येत होत्या. या तक्र ारींची नवनियुक्त प्रशासन मंडळाने गंभीर दखल घेत सोमवारपासून शेतक-यांना रोख स्वरूपात पेमेंट करण्याचे फर्मान सोडले होते.या निर्णयाला व्यापाºयांनी विरोध दर्शवत रोखीत व्यवहार करण्यासाठी पुरेशी रोख रक्कम मिळत नसल्याचे कारण दाखवत सोमवारी केवळ १५० वाहनांचा लिलाव करण्याची आडमुठी भूमिका घेतली होती. मात्र बाजार समिती संचालक मंडळाने रोख पेमेंटचा निर्णय कायम ठेवत संपूर्ण वाहनांचा लिलाव करावाच लागेल, अशी तंबी व्यापाºयांना दिल्याने व्यापाºयांनी नमते घेत सोमवारी सकाळच्या सत्रात कांद्याच्या २९० वाहनांचा लिलाव केला, तर सायंकाळी उर्वरित ३१४ वाहनांचा लिलाव केल्याची माहिती सचिव भास्कर तांबे यांनी दिली....तर तक्ररच ग्राह्य धरणारशेतमाल विक्र ी केल्यानंतर शेतकºयांनी रोख स्वरु पात पेमेंट घ्यावे. व्यापाºयांनी रोख स्वरु पात पेमेंट न दिल्यास बाजार समितीकडे चोवीस तासांच्या आत तक्र ार करावी अन्यथा तक्र ार ग्राह्य धरली जाणार नसल्याचे बाजार समिती प्रशासनाने म्हटले आहे. तर रोखीच्या चुकवतीसंदर्भात शेतकºयाने एखाद्या व्यापाºयाविरोधात तक्र ार केल्यास संबंधित व्यापाºयाला सुटीचे दिवस वजा जाता आठ दिवस लिलावात भाग घेता येणार नसल्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी