शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पांगरी येथे दुग्धाभिषेक करून दूध बंद आंदोलनास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 1:31 AM

दुधाला भाव मिळावा याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारपासून पुकारलेल्या आंदोलनात सामील होण्यासाठी पांगरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कंबर कसली आहे.

पांगरी : दुधाला भाव मिळावा याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारपासून पुकारलेल्या आंदोलनात सामील होण्यासाठी पांगरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कंबर कसली आहे. सिन्नर तालुका अध्यक्ष आत्माराम पगार, पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार व शाखाध्यक्ष बारकू पगार यांच्या नेतृत्वाखाली महादेव मंदिरातील पिंडीवर दुग्धाभिषेक करून मुंबईचे दूध बंद करण्याच्या आंदोलनास प्रारंभ करण्यात आला.  या बैठकीत पगार यांनी घोटी येथे जाऊन दूध रोखण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पाच रुपये अनुदान मिळाले पाहिजे ही प्रमुख मागणी असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सरकारने लवकरात लवकर ही मागणी पूर्ण करावी अन्यथा एकही टॅँकर मुंबईला जाऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी शांताराम पगार, विश्वनाथ पगार, संपत पगार, विलास निरगुडे, निवृत्ती गारे, राजेंद्र घोटेकर, भाऊसाहेब घोटेकर, रमेश पगार, कृष्णा घुमरे, निलेश सापनर, सागर सोनवणे आदींसह स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते.पांगरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असल्याने रविवारी रात्रीपासूनच निफाड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले यांच्या मार्गदर्शनाखाली वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे, उपनिरीक्षक मुक्तार सैयद, प्रकाश उंबरकर, रामनाथ देसाई, रमेश सदगीर, संदीप शिंदे, उमेश खेडकर आदींसह  २५ दंगा नियंत्रण पोलिसांसह बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठा