पंचवटी : गंगाघाटावरील श्री म्हसोबा महाराज पटांगणावर सरदार चौक मित्रमंडळाच्या वतीने बुधवारी (दि. २६) रोजी म्हसोबा महाराज यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष राजेश भोरे यांनी पत्रकान्वये दिली आहे. या म्हसोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त सलग तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी ९ वाजता श्री म्हसोबा महाराज अभिषेक व महापूजा करण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता श्रींची परिसरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल. गुरुवारी सायंकाळी ७ वाजता भाविकांना महाप्रसाद वाटप केला जाईल. त्यानंतर रात्री ९ वाजता दशावतारी सोंगे व बोहाडा कार्यक्रम होईल. शुक्रवारी पहाटे ६ वाजता देवी व म्हसोबा महाराजांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. म्हसोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सरदार चौक मित्रमंडळाच्या वतीने उत्सव समिती अध्यक्ष भोरे यांनी केले आहे. (वार्ताहर)
म्हसोबा महाराज यात्रोत्सवास प्रारंभ
By admin | Updated: April 26, 2017 02:06 IST