शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

शिक्षणाच्या वारीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:33 IST

शिक्षकांनी आज विद्यार्थी घडवत असताना पुढील २५ वर्षांचा विचार करून ज्ञानदानाचे कार्य करावे. भारताला शैक्षणिक महासत्ता बनवण्यासाठी केवळ शिक्षण घेऊन, डिग्री पदरात पाडून घेणे नसून व्यावसायिकदृष्ट्या सक्षम नागरिक घडविण्याचे काम शिक्षकांना करावयाचे आहे. लोकाभिमुख शिक्षण पद्धतीचा अवलंब करून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, शिक्षणातील गुणवत्ताच राष्ट्राला महासत्तेकडे घेऊन जात असल्याने शिक्षणव्यवस्थेतही काळानुरूप बदल करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.

रामदास शिंदे ।महिरावणी : शिक्षकांनी आज विद्यार्थी घडवत असताना पुढील २५ वर्षांचा विचार करून ज्ञानदानाचे कार्य करावे. भारताला शैक्षणिक महासत्ता बनवण्यासाठी केवळ शिक्षण घेऊन, डिग्री पदरात पाडून घेणे नसून व्यावसायिकदृष्ट्या सक्षम नागरिक घडविण्याचे काम शिक्षकांना करावयाचे आहे. लोकाभिमुख शिक्षण पद्धतीचा अवलंब करून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, शिक्षणातील गुणवत्ताच राष्ट्राला महासत्तेकडे घेऊन जात असल्याने शिक्षणव्यवस्थेतही काळानुरूप बदल करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.  राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत एकच ध्यास, गुणवत्ता विकास हे ध्येय साध्य करण्यासाठी चार दिवशीय शिक्षणाच्या वारीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्यभरातील वारीला हजेरी लावणाºया शिक्षक व अधिकाºयांचे शिक्षण सभापती यतिन पगार यांनी नाशिक नगरीच्या वतीने स्वागत केले. शिक्षण संचालक सुनील मगर यांनी राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक करत प्रत्येक शिक्षकाने स्वत:ची अध्यापन पद्धती विकसित करावी, असे आवाहन केले.  याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, विद्या प्राधिकरणचे शिक्षण संचालक डॉ. सुनील मगर, माजी केंद्रिय मंत्री विजय नवल पाटील, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, संदीप फाउण्डेशनचे कुलगुरु डॉ. रामचंद्रन, प्राचार्य प्रशांतपाटील, विद्या प्राधिकरणचे प्राचार्प रवींद्र जावळे, शिक्षणाधिकारी  डॉ. वैशाली झनकर, महिरावणीच्या सरपंच आरती गोराळे,  राज्यातील प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विद्या प्राधिकरणचे प्राचार्य,  गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक, विषयतज्ज्ञ उपस्थित होते. रामचंद्र जाधव यांनी प्रास्ताविक, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी सूत्रसंचलन, तर रवींद्र जावळे यांनी आभार मानले.शिक्षणाच्या वारीचे उद्दिष्ट्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्ययन पद्धतीत घडवून येणारे बदल प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहचवा, गणित व भाषा वाचन विकास, कृतियुक्त अध्यापन, बदलती पाठ्यपुस्तके, मूल्यसंवर्धन, क्र ीडा, स्वच्छता, कला व कार्यानुभव, किशोरवयीन आरोग्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, कृतियुक्त विज्ञान, दिव्यांग मुलांचे शिक्षण आदी शिक्षणाचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शिक्षणाच्या वारीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात शिक्षक व ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून मोठ्या प्रमाणावर शाळा डिजिटल केल्या असून, शासनाने मात्र अशा शाळांनी वीज करंटच दिला नसल्याची खंत माजी मंत्री विजय नवल पाटील यांनी व्यक्त केली. तसेच राज्यातील सर्व शाळांना सौर ऊर्जा सिस्टीम द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.तीन विभागातील शिक्षकांचा शैक्षणिक मेळा नाशिकच्या शिक्षणाची वारीचा अनुभव घेण्यासाठी दि. २९ जानेवारी ते  १ फेब्रुवारीपर्यंत नाशिक, पुणे व मुंबई विभागातील दहा जिल्ह्यातील शिक्षक व अधिकाºयांना शैक्षणिक उपक्र मांची माहिती जाणून घेण्याची व अनुभवण्याची संधी मिळाली आहे. शिक्षकांनी तयार केलेल्या विविध शैक्षणिक साहित्य व ज्ञान रचनावादी उपक्र मांचे ५० स्टॉल उभारण्यात आले आहेत. यामध्ये विविध शैक्षणिक उपक्र मांचे सादरीकरण करण्यात आले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद