शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

गोवर-रुबेला लसीकरणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:38 IST

पोलिओप्रमाणेच देशातून गोवर आणि रुबेला यांचेही उच्चाटन व्हावे यासाठी आरोग्य विभागातर्फे लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून मंगळवार (दि़२७) पासून या मोहिमेस प्रारंभ झाला़ जिल्हा रुग्णालयात या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी़ यांच्या हस्ते करण्यात आला़ जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ़ नरेश गिते, आरोग्य उपसंचालक डॉ़ रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकिसक डॉ़ सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ विजय डेकाटे तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ़ अनंत पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकिसक डॉ़ निखिल सैंदाणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले़ दरम्यान, पहिल्या दिवशी जिल्ह्यातील हजारो बालकांचे लसीकरण करण्यात आले़

नाशिक : पोलिओप्रमाणेच देशातून गोवर आणि रुबेला यांचेही उच्चाटन व्हावे यासाठी आरोग्य विभागातर्फे लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून मंगळवार (दि़२७) पासून या मोहिमेस प्रारंभ झाला़ जिल्हा रुग्णालयात या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी़ यांच्या हस्ते करण्यात आला़ जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ़ नरेश गिते, आरोग्य उपसंचालक डॉ़ रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकिसक डॉ़ सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ विजय डेकाटे तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ़ अनंत पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकिसक डॉ़ निखिल सैंदाणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले़ दरम्यान, पहिल्या दिवशी जिल्ह्यातील हजारो बालकांचे लसीकरण करण्यात आले़जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी यावेळी सांगितले की, गोवर-रुबेला या आजारांमुळे मुलांमध्ये कायमचा आंधळेपणा, बहिरेपणा तसेच मतिमंदता निर्माण होते़ या लसीकरणामुळे या दोन्ही आजारांपासून मुलांची मुक्तता होणार आहे़ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ जगदाळे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाडी व माध्यमिक शाळेतील ९ महिने ते १५ वर्ष वयोगटांतील सर्व बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे, तर उपसंचालक डॉ़ रत्ना रावखंडे यांनी या माहिमेत आरोग्य विभाग १९ लाख २३ हजार मुलांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले़शासनाने गोवर-रुबेला ही लस पहिल्या पंधरा दिवसांमध्ये सर्व शाळांमधून देण्याचे नियोजन केले असून प्रत्येक शाळेसाठी लसीकरणाचा दिनांक निश्चित करण्यात आला आहे़ देशभरात आतापर्यंत ९ कोटी ६० लाख मुलांना ही लस देण्यात आली आहे़ नाशिक जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून या लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला असून, पाच आठवडे ही मोहीम राबविली जाणार आहे़ यावेळी मुलांना गोवर-रुबेला लस देण्यात आली तसेच मान्यवरांचे हस्ते मुलांना गोवर-रुबेला लस दिल्याचे ‘शासनाची प्रमाणपत्रे ’ देण्यात आले़  यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही़ डी़ पाटील, जि. प. उपमुख्यकार्यकारी अधिकारी(महिला बालकल्याण) मुंडे, जिल्हा माताबालसंगोपन अधिकारी डॉ़ चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ साळवे, जागतिक आरोग्य संघटना प्रतिनिधी डॉ़ कमलाकर लष्करे, आरोग्य सहायक संचालक डॉ़ पट्टनशेट्टी, अधिसेविका मानिनी देशमुख आदी उपस्थित होते़जिल्ह्यात लसीकरणाची तयारी पूर्णनाशिक जिल्ह्यात १९ लाख २३ हजार ९७० बालकांना ही लस देण्यात येणार असून, महानगरपालिका क्षेत्रात १ लाख ९३ हजार २२२, नाशिक ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रात ११ लाख ४० हजार ४८८ लाभार्थी बालके असून त्यांना या मोहिमेचा लाभ मिळणार आहे़ यासाठी नाशिक जिल्ह्यातील ५ हजार ५०४ ग्रामीण शाळेत, तसेच ३ हजार ३२० बाह्य संपर्क सत्र, २१९ जोखीमग्रस्त भाग, ३ हजार ८८० संस्थेतील लसीकरण सत्र असे एकूण १२ हजार ९२३ ठिकाणी हे लसीकरण राबविण्यात येणार आहे़

टॅग्स :Healthआरोग्यnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद